पुणे : परदेशी जाणाऱ्या भारतीयांसाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) सीईओ अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी दिलासादायक बातमी दिली आहे. कोव्हिशील्ड (COVISHIELD) लस घेतलेल्या भारतीयांना युरोपियन युनियनमध्ये प्रवासासाठी अडचणी येत होत्या. यावर लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन पुनावाला यांनी ट्विटरवरुन दिलं आहे. कोव्हिड ग्रीन पाससाठी पात्रता निकषांमधून युरोपियन युनियनने कोव्हीशील्डला वगळले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेनंतरही युरोपीय संघाची मनमानी पाहायला मिळत आहे. (SII CEO Adar Poonawalla assures Indians who took Covishield Vaccine wont face problem while travelling European Union)
काय म्हणाले अदर पुनावाला?
“कोरोनावरील कोव्हिशील्ड लस घेतलेल्या बर्याच भारतीयांना युरोपियन युनियनमधील देशांमध्ये प्रवास करताना समस्यांचा सामना करावा लागत आहे, असे मला समजले आहे. मी सर्वांना हमी देतो, की मी हे प्रकरण उच्च स्तरावर उचलून धरले आहे. संबंधित देशांसोबत नियामकासह राजनैतिक पातळीवरही लवकरच ही समस्या मिटण्याची आशा आहे.” असं ट्वीट अदर पुनावाला यांनी केलं आहे. एक जुलैपासून युरोपियन देशांमध्ये डिजिटल व्हॅक्सिन पासपोर्ट अंमलात आणण्याची तयारी आहे. त्यानुसार युरोपिय काम किंवा प्रवासाच्या निमित्ताने जगभर भ्रमंती करु शकतात.
I realise that a lot of Indians who have taken COVISHIELD are facing issues with travel to the E.U., I assure everyone, I have taken this up at the highest levels and hope to resolve this matter soon, both with regulators and at a diplomatic level with countries.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) June 28, 2021
‘कोव्हिशील्ड’ लसीबद्दल जाणून घ्या
‘कोव्हिशील्ड’ (covishield) या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या आपत्कालीन वापराला जानेवारी महिन्यात भारतात मंजुरी मिळाली होती. ही भारतातील पहिली लस ठरली होती. ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनिका (Oxford AstraZeneca Coronavirus Vaccine) या कंपनीनं विकसित केलेली आणि पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये (Serum Institute of India) उत्पादित होणारी ‘कोव्हिशील्ड’ लस आहे. ‘कोव्हिशील्ड’ चाचण्यांदरम्यान 90 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरली होती. ‘कोव्हिशील्ड’चे दोन डोस घेण्यामध्ये 84 दिवसांचे अंतर सध्या ठेवले आहे.
दरम्यान, क्यूटीस या कंपनीने सीरम इन्स्टिट्यूटविरोधात दाखल केलेली याचिका जानेवारी महिन्यात फेटाळण्यात आली होती. सीरमने कोव्हीशिल्ड लसीसाठी ट्रेडमार्क वापरल्याचा आरोप क्यूटीस कंपनीने केला होता. ट्रेडमार्क वापरल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, असा दावा क्यूटीस कंपनीने केला होता. त्यासाठी क्यूटीस कंपनीने पुणे जिल्हा न्यायालयात याचिका दाकल केली होती. याच याचिकेवर निकाल देताना दोन्ही वेगवेगळी उत्पादनं आहेत, त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम होण्याचं कारण नाही, असं सांगत कोर्टाने याचिका फेटाळली होती.
संबंधित बातम्या :
कोव्हिशिल्ड लसीचे किती डोस तयार, तुम्हाला कशी आणि किती रुपयात मिळणार?
कोरोना लसीची किंमत कमी करा; केंद्र सरकारकडून सिरम आणि भारत बायोटेकला निर्देश
(SII CEO Adar Poonawalla assures Indians who took Covishield Vaccine wont face problem while travelling European Union)