Sindhutai Sapkal | ….म्हणून सिंधुताई सकपाळ यांच्या पार्थिवाचे दफन करण्यात आले

| Updated on: Jan 05, 2022 | 6:05 PM

सिंधूताई सकपाळ यांनी महानुभव पंथाचा स्वीकार केला होता. त्यामुळे या पंथांच्या रूढी प्रमाणेच आपले अंत्यसंस्कार व्हावेत ही त्यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थीव दफन करण्याचा निर्णय घेतला.

Sindhutai Sapkal | ....म्हणून सिंधुताई सकपाळ यांच्या पार्थिवाचे दफन करण्यात आले
SINDHUTAI SAPKAL
Follow us on

पुणे – अनाथांची माय म्हणून आयुष्यभर अनाथ मुलांसाठी आयुष्य वेचलेल्या जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांचं ह्दयविकाराच्या झटक्यानं काल निधन झालं. त्यांच्यावर पुण्यातील ठोसर पागा स्मशानभूमीत अग्नीसंस्कार ऐवजी महानुभव पद्धतीनं अंत्यसंस्कार करत त्यांचे पार्थिव दफन करण्यात आले. माईंच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता दफन का करण्यात आला यावर चर्चा सुरु झाल्या . त्यावर त्यांच्या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

सिंधुताई सकपाळ यांची होती ईच्छा

सिंधूताई सकपाळ यांनी महानुभव पंथाचा स्वीकार केला होता. त्यामुळे या पंथांच्या रूढी प्रमाणेच आपले अंत्यसंस्कार व्हावेत ही त्यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थीव दफन करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या अंतयात्रेदरम्यान चक्रधर स्वामींच्या नावाचा जप सुरु होता. तसेच श्रीमद्भागवत गीतेतील श्लोक यावेळी म्हणण्यात आले.

अशी सुरु झाली प्रथा

महानुभव पंथाचे प्रमुख चक्रधर स्वामी खडकुली येथे वास्तव्यास असताना एका भक्ताचं निधन झाले तेव्हा स्वामींनी त्याचेदफन करण्यास संगितले.तेव्हापासून महानुभाव पंथात याच पद्धतीनं अंतविधी करण्यास सुरुवात झाली. महानुभव पंथात या विधीला भूमी डाग असे म्हणतात . अशे माहिती जाधववाडी येथील मठातील सदस्यांनी ही माहिती महाराष्ट्र टाईम्स या या दैनिकाला दिली आहे. या प्रकारे दफनविधी केल्यानंतर त्या व्यक्तीची समाधी उभारली जात नाही.

असे करतात दफन

महानुभाव पंथ स्विकारलेल्या व्यक्तीला दफन केले जाते.

दफन करताना एक खड्डा केला जातो. त्या खड्ड्यात एक कपार केली जाते.

त्या खड्ड्यात मीठ टाकतात त्यानंतर मृतदेह ठेवल्यानंतर वरुन पुन्हा एक दोन पोती मीठ टाकलं जातं.

त्यानंतर माती टाकली जाते.

महानुभव पंथात पार्थिव दफन करण्यासाठी नेण्यापूर्वी गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे स्मरण केले जाते.

पार्थिव डोलीमध्ये ठेवून दफन करण्यासाठी नेले जाते.

दफनस्थळी गेल्यानंतरही गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे स्मरण केले जाते.

महानुभाव पंथामध्ये दफन केलं जातं परंतु समाधी केली जात नाही.

Corona update : राज्यातील सर्व वसतिगृह बंद राहणार, कोणती विद्यालयं सुरू, कोणती बंद? वाचा सविस्तर

Video | एक दोनदा नाही, 16 वेळा चावला! चिमुरडीचा पाठलाग करत कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

Sindhutai sakpal : सिंधुताईंनंतर अनाथांची माय कोण?; ममता सपकाळ चालवणार वारसा?