राजकारणातील अनोखा योगायोग, भाऊ-बहीण झाले सरपंच अन् उपसरपंच

| Updated on: Apr 22, 2023 | 12:21 PM

Sarpanch and upsarpanch election : एखाद्या गावात भाऊ अन् बहिण सरपंच अन् उपसरपंच होण्याचा दुर्मिळ योग आला आहे. पुणे जिल्ह्यात एकाच वेळी नातेवाईकांना गावातील दोन्ही मोठी पदे मिळाली आहे. या योगायोगाची चर्चा होत आहे.

राजकारणातील अनोखा योगायोग, भाऊ-बहीण झाले सरपंच अन् उपसरपंच
Follow us on

मुळशी, पुणे : गावातील राजकारण हे दिल्ली, मुंबईतील राजकारणापेक्षा वेगळे असते. गावात सर्वांना सोबत घेऊन चालावे लागते. प्रत्येक गट आणि समाजाला स्थान द्यावे लागते. नाहीतर लहान गावांमधील राजकारण कटूता निर्माण करु शकते. राज्यातील राजकारणात पुणे जिल्ह्यातील राजकारणाची चर्चा नेहमी होत असते. त्याचा आदर्श घेऊन नवनवीन पायंडे पडत असतात. आता पुणे जिल्ह्यात एकाच वेळी भाऊ सरपंच झाला तर बहीण उपसरंपच झाली. एकाच वेळी नातेवाईकांना गावातील दोन्ही मोठी पदे मिळाल्याचा हा दुर्मिळ योगायोग ठरला.

कुठे झाली निवडणूक

पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यातील भुकूम गावात सरपंच आणि उपसरपंचाची निवडणूक होणार होती. परंतु सर्व सदस्यांनी मिळून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर भुकूम गावाच्या इतिहासात प्रथमच मावस बहीण-भाऊ सरपंच -उपसरपंच पदी विराजमान झाले आहेत. गावाच्या सरपंचपदी मयुरी आमले यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंचपदी अंकुश खाटपे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

हे सुद्धा वाचा

मयुरी यांच्या माध्यमातून महिला राज

गावात सरंपचपद महिलेकडे गेले आहे. मयुरी आमले सरपंच झाल्या आहेत. यामुळे गावाचा कारभार एका आर्थाने महिलांकडे गेला आहे. युवा सरंपच झालेल्या मयुरी आमले गावाच्या विकासासाठी मोठा बदल करणार आहे. यामुळेच गावकऱ्यांनी विश्वासाने त्यांची बिनविरोध निवड केली आहे.

सर्वच क्षेत्रात महिला

सध्या नोकरी, व्यवसाय, राजकारण, समाजकारण आता सर्वच क्षेत्रात महिला मजल मारत आहे. राजकारणात अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. महिला संधी मिळाल्यास तिने तिचे सोने करून गावाचा कायापालट केला आहे. कधी घराचा उंबरठा ओलांडला नसलेली महिला आता गावचा कारभार सांभाळत आहेत.

बिनविरोध निवड गरजेची का

ग्रामपंचायत निवडणुकीत कुठलाही उमेदवार राजकीय पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढत नसला तरी राजकीय पक्षांचा निवडणुकीत शिरकाव असतोच. मतदार संख्या कमी असल्याने प्रत्येक मत अत्यंत महत्वाचे होऊन जाते. त्यामुळे गावातील समाज जीवन पूर्णपणे ढवळून निघते. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतात, अनेक वेळा भांडणं-वाद निर्माण होतात. गाव हा पक्षांमध्ये, जातीमध्ये विभागाला जाऊन भावकी आणि समाजामध्ये दुफळी निर्माण होते. यामुळे बिनविरोध निवड कधी चागंली संस्कृती आहे.