Pune News | लिफ्टमध्ये अडकला सहा वर्षांचा मुलगा, पुणे परिसरातील धरणे दमदार पावसामुळे भरली

| Updated on: Sep 24, 2023 | 10:39 AM

Pune rescue operation News | पुणे शहरातील एक लिफ्टमध्ये सहा वर्षांचा मुलगा अकडला होता. अचानक लिफ्ट बंद पडल्यामुळे मुलगा घाबरला होता. घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी पोहचले. त्यांनी मुलाच्या सुटकेसाठी सेस्क्यू ऑपेरेशन सुरु केले.

Pune News  | लिफ्टमध्ये अडकला सहा वर्षांचा मुलगा, पुणे परिसरातील धरणे दमदार पावसामुळे भरली
pune rescue operation
Image Credit source: tv9 Marathi
Follow us on

पुणे | 24 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात एका लिफ्टमध्ये सहा वर्षांचा मुलगा अडकल्याची घटना भवानी पेठेत घडली. शनिवारी रात्री ९ वाजता तो लिफ्टमध्ये असताना लिफ्ट बंद पडली. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला फोन केला गेला. त्यानंतर अग्नीशमन दलाचे जवान भवानी पेठ येथील घटनास्थळी पोहचले. लिफ्ट बंद पडल्यामुळे इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मुलगा अडकला. घाबरलेल्या त्या मुलाशी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी संवाद साधत त्याला धीर दिला. मुख्यालयातून तातडीने फायरगाडी आणि रेस्क्यू व्हॅन मागवली. लिफ्ट रुममध्ये जाऊन तांत्रिक कार्य पूर्ण केले. लिफ्टमध्ये पहिल्या मजल्यावर समांतर स्प्रेडर लावण्यात आला. त्यानंतर लिफ्टचा दरवाजा उघडत २० मिनिटांत मुलाची सुखरुप सुटका केली.

पुणे धरणे शंभर टक्के भरली

चाकण परिसरातील १९ गावे आणि आळंदी तसेच पुणे शहर अन् पिंपरी चिंचवड शहरासाठी भामाआसनखेड धरण लाभदायक आहे. खेड तालुक्यातील हे धरण १०० टक्के भरले आहे. पाऊस नसल्यामुळे गेली अनेक दिवस हे धरण ८३ ते ८४ टक्क्यांवर स्थिरावले होते. परंतु दोन दिवसांपासून दमदार पाऊस झाल्यामुळे धरण शंभर टक्के भरले. पुणे परिसरातील इतर धरणांमध्ये शंभर टक्के जलसाठा झाला आहे.

आंबेगाव तालुक्यात शेततळे फुटले

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे काठापूर येथील शेततळे फुटले. त्यामुळे शेकडो एकर शेतीचे नुकसान झाले. यामुळे विहिरीसुद्धा पुराच्या पाण्यात बुडाल्या. शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके पाण्यात बुडली. शेतीचे मोठे नुकसान झाले.

हे सुद्धा वाचा

खेड-शिवापूर रस्त्यावर पाणी

पुणे, सातारा महामार्गावर खेडशिवापूर परिसरात शनिवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे वेळू, खेडशिवापूर परिसरातील सेवा रस्त्यांवर पाणीच पाणी साचले होते. मुसळधार बरसलेल्या पावसामुळे रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागली.

पुणे-सोलापूर शिवाई ई-बससेवा सुरु

राज्य परिवहन महामंडळाने प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने शिवाई ई-बससेवा सुरु केली आहे. अनेक भागांत ही बससेवा सुरु झाली आहे. पुणे, सोलापूर मार्गावर पहिली शिवाई ई-बससेवा सुरु झाली आहे. इंदापूर येथील बस स्थानकावर ही बस पहिल्यांदा दाखल झाली. त्यानंतर इंदापूरकरांनी या बसचे स्वागत केले.