सागर सुरवसे, सोलापूर : रेल्वेची कामे अनेक ठिकाणी सुरु आहे. या कामांमुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करावा लागतो. रेल्वेने सोलापूर विभागात चार दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे अनेक एक्स्प्रेस रद्द तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. यामुळे प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी अपडेट माहिती घेऊन प्रवास करावा. 25 ते 30 मार्च पर्यंत सोलापूर विभागातून धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे.सोलापूर विभागातील काही स्टेशनदरम्यान नॉन इंटरलॉक आणि दुहेरीकरण तसेच ब्लॉकचे काम सुरु आहे, त्यामुळे हा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.
चार दिवस वेळापत्रक बदल
सोलापूर विभागातील काही स्टेशनदरम्यान नॉन इंटरलॉक आणि दुहेरीकरणचे काम 25 ते 30 मार्च दरम्यान होणार आहे. त्यामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. चार दिवसांचा मेगा ब्लॉक असल्यामुळे रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आलेय. 25 ते 30 मार्चपर्यंत सोलापूर विभागातून धावणाऱ्या गाड्यांसाठी हा बदल असणार आहे.यामुळे सोलापूर विभागातून प्रवास करणाऱ्या प्रवास यांची गैरसोय होणार आहेत.
कोणत्या गाड्या रद्द
दौंड-मनमाड सेक्शनमध्ये काम
दौंड-मनमाड सेक्शनमध्ये रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे २८ मार्च ते १ एप्रिल दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.
कोणत्या गाड्या रद्द