लॉकडाऊन काळात पुण्यातील सौरउर्जेच्या वापरात दुपटीने वाढ

| Updated on: Jul 31, 2021 | 7:57 AM

Solar Energy | 2018-19 मध्ये व्यावसायिक ऊर्जेचा वापर 1324.53 दशलक्ष युनिट इतका झाला होता. मात्र, लॉकडाऊन लागल्यानंतर 2019-20 या वर्षात 743.56 दशलक्ष युनिट इतका झाल्याने या काळात विजेची मागणी तब्बल 50 टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे स्पष्ट झाले.

लॉकडाऊन काळात पुण्यातील सौरउर्जेच्या वापरात दुपटीने वाढ
सौरउर्जा
Follow us on

पुणे: लॉकडाऊनच्या काळात पुण्यात सौरउर्जेच्या वापरात मोठी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही वाढ थोडीथोडकी नसून जवळपास दुप्पट आहे. लॉकडाऊनच्या काळात दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याने अनेक कार्यालये, बाजारपेठा आणि दुकाने बंद होती. त्याचा थेट परिणाम वीजेच्या मागणीवर झाल्याचे पुणे महानगरपालिकेच्या पर्यावरण अहवालातून समोर आले आहे.

2018-19 मध्ये व्यावसायिक ऊर्जेचा वापर 1324.53 दशलक्ष युनिट इतका झाला होता. मात्र, लॉकडाऊन लागल्यानंतर 2019-20 या वर्षात 743.56 दशलक्ष युनिट इतका झाल्याने या काळात विजेची मागणी तब्बल 50 टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे स्पष्ट झाले. याच कालावधीत सौरऊर्जेचा वापर दुप्पटीने वाढला आहे.

या अहवालात दिलेल्या माहितीप्रमाणे पुण्यात सर्वाधिक वापर हा घरगुती वापरासाठी होत असून, त्या खालोखाल व्यवसाय, उद्योग, महापालिकेचे प्रकल्प, शेती यासाठी होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

घरासाठी किती किलोवॅटचा सोलर प्लांट?

तुमच्या घरासाठी किती किलोवॅटचा सोलर प्लांट लागेल हे तुम्हाला किती वीज लागते यावर अवलंबून आहे. तुम्हाला महिन्याला वीजेचे बिल 1000 रुपये येत असेल तर 1 किलोवॅटचा प्लांट तुमच्यासाठी योग्य आहे. 10 हजार रुपये वीजेचे बील असेल तर त्या घरासाठी 10 किलोवॅटचा सोलर प्लांट लागेल.

सोलर पॅनल लावण्यासाठी न्यू एन्ड रिन्यूएबल एनर्जी मंत्रालयाकडून 30 टक्क्यांचे अनुदान दिले जाते. घराच्या छतावर सोलर पॅनल्स इन्स्टॉल करण्याचा खर्च साधारण एक लाख रुपये इतका आहे. त्यापैकी 30 हजार तुम्हाला केंद्र सरकारकडून मिळतील. सोलर पॅनल लावण्यासाठी राज्यांकडूनही अनुदान मिळते. मात्र, त्याची रक्कम वेगवेगळी असते. सोलर पॅनल्सची कालमर्यादा साधारण 25 वर्षांची असते. 10 तासांच्या सूर्यप्रकाशामुळे 10 युनिट वीज तयार होते. याचा अर्थ दोन किलोवॅटचा सोलर पॅनल लावल्यास महिन्याला 300 युनिट वीज तयार होईल. ही वीज तुम्ही विकू शकता.

किती वीजेची निर्मिती होते?

10 किलोवॅट प्लांटच्या माध्यमातून महिन्याला 1200 युनिट वीजेची निर्मिती होते. त्यानुसार तुम्ही तुमच्या घरासाठी सोलर प्लांटची निवड करावी. 10 किलोवॅटच्या सोलर प्लांटसाठी तुम्हाला साधारण 4 लाख रुपये इतका खर्च येतो. तर 5 किलोवॅटच्या सौरउर्जा प्लांटसाठी 2.5 लाख रुपये इतका खर्च येतो.

संबंधित बातम्या:

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारी संस्था, विद्यापीठांचं सहकार्य घ्या, नितीन राऊत यांची महावितरणला सूचना

Solar Energy: घरावर सोलर पॅनल्स लावायचेत, जाणून घ्या किती खर्च येणार?

आता सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करा, ‘महावितरण’कडून वेबसाईट लॉन्च