Chhagan Bhujbal | मंत्री छगन भुजबळ पुन्हा आक्रमक; मनोज जरांगे यांना लगावला टोला, केली ही मागणी

| Updated on: Jan 03, 2024 | 10:37 AM

Chhagan Bhujbal | मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा मनोज जरांगे पाटील यांना टोला हाणला आहे. सध्या देशात सगळीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वारे आहे. तेच निवडून येतील. जागा वाटपाबाबत कुठलाही वाद नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत तीनही पक्ष एकत्रित बसवून ठरवतील, असे ते म्हणाले.

Chhagan Bhujbal | मंत्री छगन भुजबळ पुन्हा आक्रमक; मनोज जरांगे यांना लगावला टोला, केली ही मागणी
Chhagan Bhujbal
Follow us on

पुणे | 3 डिसेंबर 2024 : मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना टोला हाणला आहे. ओबसीमधूनच (OBC) आरक्षण पाहिजे यासाठी काही नेते ताकद लावत असल्याची टीका त्यांनी केली. याप्रकरणात आपण अॅडव्होकेट जनरल यांच्याशी ते बोलले आहेत. राज्य सरकार आणि मागासवर्ग आयोगातर्फे शपथपत्र दाखल झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. भुजबळ पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. दोन महिन्यात जातगणना पूर्ण करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. जागा वाटपाबाबत कुठलाही वाद नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत तीनही पक्ष एकत्रित बसवून ठरवतील, असे ते म्हणाले.

शनिवारी ओबीसी एल्गार मेळावा

६ जानेवारी रोजी पंढरपूर येथे ओबीसी एल्गार मेळावा होत आहे. ७ तारखेला राष्ट्रवादीचा कार्यक्रम, तिथे मला राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आज ते नायगाव येथे सावित्री बाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत. भिडे वाड्याची डिझाईनची तपासणी सुरू आहे. काम लवकर व्हावं अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली.

हे सुद्धा वाचा

ओबीसी समाजासाठी काम करण्याचे लागले वेड

मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना, ओबीसी समाजासाठी काम करण्याचे मला वेड लागल्याचा भुजबळ म्हणाले. तुम्ही घरो घरी सर्वेक्षण करा, २ दिवसात करा किंवा १५ दिवसात, तुम्ही ५० टक्के लोकांचे सर्वेक्षण १५ दिवसात करणार मग सगळ्यांचं करा, एक महिना लागेल अजून काय, मला कल्पना नव्हती, मी त्यात समिती मध्येच नाही, जे आज घडलं ते कदाचित तेव्हाच झालं असते, असे ते म्हणाले.

महानंदाप्रकरणात त्रुटी झाली

महानंदा डेअरी गुजरातकडे जाणार असल्याचं मी वाचलं. पण सरकार आणि त्यांच्या कामात त्रुटी झाली आहे. महाराष्ट्रातून हे काम जावं अस मला वाटत नाही याबाबत अजित दादा सांगतील, अशी भूमिका भुजबळ यांनी मांडली.

मुख्यमंत्री महायुतीचाच होणार

महायुतीच्या घटक पक्षात जागा वाटपाबाबत कुठलाही वाद नसल्याचे ते म्हणाले. या बाबत तिन्ही पक्षांचे लोक एकत्र बसून ठरवतील. कुठलाही वाद नाही. जितकी ताकद तसे वाटप होईल, असे ते म्हणाले. सध्या सगळीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वारे आहे. तेच निवडून येतील. महायुतीचा मुख्यमंत्री होईल. आता पण आमचाच महायुतीचा मुख्यमंत्री आहे म्हणजे शिंदे आहेत आमचेच आहेत, असे ते म्हणाले.