‘स्पुफिंग कॉल’ने खंडणी मागण्याचे नवे तंत्र, पुणे शहरातील प्रकारानंतर तुम्ही व्हा सावध अन्यथा

| Updated on: Mar 28, 2023 | 5:38 PM

पुणे शहरात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करुन स्पुफिंग कॉल करण्यात आला. मोहोळ यांच्या नावानेच त्यांच्या मित्राकडे तीन कोटी रुपयांची मागणी केल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी सायबर पोलिसांनी कारवाई केली आहे.

स्पुफिंग कॉलने खंडणी मागण्याचे नवे तंत्र, पुणे शहरातील प्रकारानंतर तुम्ही व्हा सावध अन्यथा
Follow us on

पुणे : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने तीन कोटींची खंडणी मागितल्याचा प्रकार सोमवारी समोर आला होता. मुरलीधर मोहोळ यांच्या मित्रास तंत्रज्ञानाचा वापर करुन कॉल करण्यात आले. त्यामुळे मोहोळ हेच कॉल करत असल्याचे समोरच्या व्यक्तीला वाटत होते. परंतु गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपीला अटक केली. त्यांच्याकडून अनेक साहित्य जप्त केले. माझ्या दोन व्यवसायिक मित्रांना पैसे मागितले जात आहेत असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनीच सांगितले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला मी ओळखत नाही तो कोण आहेत याची माहिती नाही, असे मोहोळ यांनी सांगितले.

काय झाला प्रकार


माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करुन स्पुफिंग कॉल करण्यात आला. मोहोळ यांच्या नावानेच त्यांच्या बांधकाम व्यावसायिक मित्राकडे तीन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेते तत्परता दाखवत सापळा रचला. १० लाख रुपये घेताना आरोपीला पकडले. संदीप पाटील याने हा प्रकार केला. संदीप पाटील मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील. कोरोना काळात त्याची नोकरी गेली. त्यामुळे व्याजाने पैसे घेतले होते. कर्जाचा डोंगर वाढत असल्याने त्यांने इंटरनेटवरुन स्पुफिंग कॉल कसा करावा, याचे धडे घेतले. त्यांच्या ट्रॅपमध्ये ३० ते ४० जण होते.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी यांनाही केले होते लक्ष


अजित पवार यांचा पीए बोलत असल्याचे भासवून एकाने फसवण्याचा प्रयत्न केला होता. चंद्रकांत पाटील यांच्या नावानेही अनेकांची फसवणूक केली होती. सीरम इन्सिट्यूटचे कार्यकारी संचालक आदर पूनावाला यांच्या नावाने व्हॉट्सअॅप मेसेज करुन कोट्यवधींची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला.

अशी घ्या खबरदारी


स्पुफिंग कॉल हा प्रकार नवीन आहे. इंटरनेटचा वापर करुन स्पुफिंग कॉल केला जातो. यामुळे कोणत्याही प्रतिष्ठीत व्यक्तीचा फोन, मेल आला तर त्याला प्रत्यक्ष संपर्क करुन तपासणी करुन घ्यावी. अन्यथा तुमचीही फसवणूक होऊ शकते.