पुणे: भारत सरकारनं आपापर्यंत तीन कोरोना प्रतिबंधक लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. सीरमची कोविशील्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि रशियाच्या स्पुतनिक वी (Sputnik V) लसीला मंजुरी देण्यात आली आहे. स्पुतनिक वी लसीचे भारतातील वितरण हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी यांच्याकडून करण्यात येत आहे. स्पुतनिक वी लस आता पुणे (Pune) शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध झाली आहे. स्पुतनिक वी लसीचा एक डोस 1142 रुपयांना खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. (Sputnik V corona vaccine available in Pune check details here)
पुणे शहरातील रुग्णालयांना स्पुतनिक वी लसीचे 600 डोस पहिल्या टप्प्यात प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्रातील स्पुतनिक लसीचा पहिला डोस पुण्यात दिला गेला. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात एका 36 वर्षीय व्यक्तीला स्पुतनिकची लस दिली गेली, असं डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी सांगितलं.
डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी स्पुतनिक वी लसीची पहिली खेप प्राप्त झाली तेव्हा पहिली लस डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या कर्मचाऱ्याला दिली गेली होती. पुणेकरांना स्पुतनिक वी लस 28 जूनपासून उपलब्ध होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे. मात्र, लस घेण्यासाठी कोविन अॅप आणि पोर्टलवर पूर्वनोंदणी करणं आवश्यक आहे, असं देखील ते म्हणाले आहेत.
रशियानं तयार केलेल्या स्पुतनिक लसीचे दोन डोस घेण्यामधील अंतर हे 21 दिवसांचं निश्चित करण्यात आलं आहे. पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना लसीचा दुसरा डोस 21 दिवसानंतर घ्यावा लागतो. स्पुतनिक वी लसीच्या एका डोसची किमंत 1142 रुपये निश्चित करण्यात आलेली आहे.
स्पुतनिक व्ही लस किती प्रभावी आहे, त्यावरही एक नजर टाकुयात. सायन्स जर्नल असलेल्या द लँसेटमध्ये या लसीचे शेवटच्या टप्प्यातील निष्कर्ष घोषित करण्यात आले आहेत. त्यानुसार स्पुतनिक व्ही लस कोरोनाविरुद्ध तब्बल 92 टक्के प्रभावी आहे. मॉस्कोतील गॅमालिया इन्स्टिट्युटद्वारे ही लस विकसित करण्यात आलीय. या लसीचे ट्रायल होण्याआधीच रशियात या लसीला मंजुरी मिळाली होती. त्यामुळे ही लस वादातही सापडली होती. मात्र, आता ही लस अत्यंत प्रभावी असल्याचं समोर आलं आहे.
ही लस विकसित करण्यासाठी सर्दीच्या विषाणूचा वापर करण्यात आला आहे. स्पुतनिक व्ही लसीला एकूण 55 देशांमध्ये मान्यता देण्यात आलीय. स्पुतनिक लसीचा पहिला डोस दिल्यानंतर 21 दिवसांनीच दुसरा डोस दिला जातो. 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानातही साठवता येते. त्यामुळं भारतासारख्या उष्ण तापमानाच्या देशात ही यशस्वी ठरु शकते. देशात लसीचा तुटवडा आहे. त्यात स्पुतनिक लस आल्यानं देशभरातल्या लसीकरण मोहिमेला चांगलाच हातभार लागणार आहे.
18+ नागरिकांच्या लसीकरणावरून आभार माना, UGC च्या सूचना; लसीकरण म्हणजे उपकार नाही, रोहित पवारांचा पवित्राhttps://t.co/Gbc0UQPDKr#Vaccination #Rohitpawar #UGC
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 25, 2021
संबंधित बातम्या:
स्पुतनिकचा एक डोस हजाराच्या घरात, कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनची किंमत किती?
व्हॅक्सीनचा दुसरा डोस इतर राज्यात घेता येतो का?; ‘या’ पाच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीतच हवेत
Sputnik V corona vaccine available in Pune check details here