पुणे : ऑलम्पिकमध्ये देशाला पहिलं वैयक्तिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांचा पुणे विद्यापीठातील क्रीडा संकुलात पुतळा उभारला जाणार आहे. त्या दृष्टीने विद्यापीठ प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. त्याचबरोबर विद्यापीठाच्या (Pune University) क्रीडा संकुलाला खाशाबा जाधव यांच नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आतापर्यंत क्रीडा संकुलासाठी विद्यापीठानं 50 कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये क्रीडा संकुलाचा इनडोअर विकास करण्यात येत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमध्ये देशाचे पहिले ऑलम्पिक वीर तसेच कराडचे पैलवान खाशाबा जाधव यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठीची कायदेशीर प्रक्रियाा सुरु करण्यात आली आहे. विद्यापीठातील क्रीडा संकुलात हा पुतळा उभारला जाणार आहे. त्याचबरोबर पुणे विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाला खाशाबा जाधव यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. विद्यापीठाने आतापर्यंत क्रीडा संकुलाच्या विकासासाठी 50 कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये सुशोभिकरण तसेच वेगवेगळ्या खेळांच्या मैदानाची दुरुस्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाने खर्च केलेल्या 50 कोटी रुपयांपैकी काही रक्कम ही विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मिळालेली आहे. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये देशाला वैयक्तिक खेळात पहिले पदक देऊन संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावली. त्यांच्या या कार्याची दखल तसेच भावी खेळाडूंना त्यांचा पुतळा एक प्रेरणा ठरवा म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.
दरम्यान, मागील वर्षी जानेवारी महिन्यात केंद्र सरकारकडून 119 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. यावेळी खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यांनी नाराजी व्यक्त केली होती. खाशाबा जाधव यांची कामगिरी पद्म पुरस्कारासाठी पात्र नाही हे एकदा सरकारने जाहीर करावं, अशी उद्विग्न नाराजीची प्रतिक्रिया त्यावेळी रणजीत जाधव यांनी दिली होती.
इतर बातम्या :
Virat Kohli Test Captaincy: कर्णधारपद सोडताच विराटवर टांगती तलवार, कसोटी संघात स्थान टिकणार का?