पुणे, दि. 24 नोव्हेंबर | बारावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. बारावीत विद्यार्थ्यांनी फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटीक्स घेतले असेल तरी तुम्हाला डॉक्टर होता येणार आहे. मेडिकल प्रवेशासाठी आता बारावीत बायोलॉजी विषयाची सक्ती राहणार नाही. यासंदर्भातील अट बदलण्यात आली आहे. नॅशनल मेडिकल कमीशनकडून यासंदर्भात नवीन गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. येत्या 2024 पासून हा निर्णय लागू होणार आहे. परंतु बॉयोलॉजी नसणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीत अतिरिक्त विषय म्हणून बायोलॉजी/बायो-टेक्नोलॉजीची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. भारतीय मेडिकल कमीशनकडून (MCI) पदवी चिकित्सा शिक्षासंदर्भातील 1997 च्या नियमात बदल केला आहे. त्यानियमानुसार बारावीत बॉयोलॉजी असणारे विद्यार्थींची मेडिकलची प्रवेश परीक्षा देऊ शकत होते.
MCIच्या नवीन नियमानुसार, बॉयोलॉजी नसणारे विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी विदेशात जाऊ शकतात. यापूर्वी अकरावी, बारावीत बॉयोलॉजी असणे गरजेचे होते. पूर्वी ग्रेजुएट मेडिकल एजुकेशन, 1997 नियमानुसार एमबीबीएस, बीडीएस प्रवेशासाठी अकरावी आणि बारावीत दोन वर्ष बॉयोलॉजी पडणे गरजेचे होते. हा अभ्यासक्रम नियमित कॉलेजमधून पूर्ण करावा लागणार होता. दिल्ली उच्च न्यायालयाने 2018 मध्ये हा नियम रद्द केला. नवीन नियमामुळे मेडिकल डिग्री घेण्यास इच्छूक असणाऱ्या ए ग्रुपच्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. या संदर्भात 14 जून 2023 MCI ची बैठक झाली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयालाने नीट परीक्षेसाठी देशातील सर्व बोर्डांना एकत्र आणले आहे. CBSE आणि CISCE ही दोन बोर्ड राष्ट्रीय स्तरावर आहे. त्यानंतर प्रत्येक राज्यात बोर्ड आहे. अशी एकूण ६० बोर्ड आहेत. प्रत्येक बोर्डाचा शैक्षणिक दर्जा आणि अभ्यासक्रम वेगळा असतो. तसेच परीक्षांचे निकाल आणि मूल्यमापन यामध्ये फरक असतो. यामुळे या सर्वांमध्ये एकसमानता आणण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहेत. मेडीकलच्या प्रवेशासाठी NEET आणि इंजिनिअरींगच्या प्रवेशासाठी JEE Main परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागते. त्यामुळे बोर्डानुसार फरक पडतो. तो पडू नये, अशी भूमिका केंद्रीय शिक्षण मंडळाने घेतली आहे.