मावळ : मावळ (Maval) तालुक्यातील कुंडमळ्यात दोन तरुणी पाय घसरून पडल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एका तरुणीला वाचविण्यात यश आले आहे, तर दुसऱ्या तरुणीचा शोध सुरू आहे. देहूगाव येथील या दोन तरुणी कुंडमळ्यात फिरायला गेल्या होत्या. योगिता भूषण वाघ (वय 23) आणि इंदू मकलारी (वय 18), अशी दोघींची नावे आहेत. यापैकी योगिताला वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आले आहे. तर इंदुचा मृतदेह (Deadbody) शोधण्यात आला. हा मृतदेह तळेगाव दाभाडे ग्रामसुरक्षा दल सभासद, एमआयडीसी पोलीस आणि शिवदुर्ग रेस्क्यू (Rescue) टीमने खोल पाण्यात जाऊन शोधला. या मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी तळेगाव दाभाडे येथे रवाना करण्यात आला आहे.
या तरुणींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची सध्या चर्चा आहे. मात्र त्यास अधिकृत असा दुजोरा मिळालेला नाही. याप्रकरणी आता पोलीसही तपास करत आहेत.