Mpsc student suicide : एमपीएससीची तयारी करणाऱ्या आणखी एका तरुणाची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले…
मल्हारी नामदेव बारवकर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. एमपीएससीच्या परीक्षेचे त्याने तीन पेपर दिले होते. मल्हारी एमपीएससी परीक्षेची पूर्व तयारी करत होता. त्याचे वय अवघे 25 वर्षे होते.
Follow us on
पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वीच एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्निल लोणकरची आत्महत्या ताजी असतानाच, एसपीएससीची तयारी करणाऱ्या आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. दौंड तालुक्यातील देऊळगावगाडा या गावात ही घटना घडली आहे. सदर तरुणाने एमपीएससीची तीन वेळा परीक्षा दिली होती, त्यानंतर त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मल्हारी नामदेव बारवकरची आत्महत्या
मल्हारी नामदेव बारवकर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. एमपीएससीच्या परीक्षेचे त्याने तीन पेपर दिले होते. मल्हारी एमपीएससी परीक्षेची पूर्व तयारी करत होता. त्याचे वय अवघे 25 वर्षे होते. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मल्हारी बारवकरचे चुलते महादेव पांडुरंग बारवकर यांनी पाटस पोलीस स्टेशनला दिली आहे.
आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत लिहिले…
मल्हारी बारवकर या विद्यार्थ्यांने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिट्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत त्याने मी तुम्हाला दाखवलेली स्वप्ने आता पूर्ण करू शकत नाही. तुमचे पडालेले चेहरेही मी पाहू शकत नाही. माझ्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही. अतिविचार, संपलेला आत्मविश्वास, भविष्यताही काही सकारात्मक चित्र दिसत नाही. चांगल्या जगण्याच्या आशा संपल्या आहेत, सॉरी असे त्याने लिहून ठेवले आहे. त्यामुळे परिसरात शोकाकूल वातावरण पसरले आहे. अलिकडच्या काळात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण जास्त वाढले आहे. तणावातून आणि नैराश्यातून युवा पिढी असे नकारात्मक निर्णय घेत आहे. या युवा पिढीला सकारात्म दृष्टीकोण देण्याची जबाबदारी कुटुंबीय, समाज आणि शासन या सर्वांची असणार आहे.