भीती वाटत नाही का? सुषमा अंधारेंचा सवाल, राऊतांचं रोखठोक उत्तर

| Updated on: Jan 29, 2024 | 3:43 PM

खासदार संजय राऊत यांच्या आज प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारले. यावेळी सुषमा अंधारे यांनी त्यांना सध्याच्या राजकीय घडामोडींवर विविध प्रश्न विचारले.

भीती वाटत नाही का? सुषमा अंधारेंचा सवाल, राऊतांचं रोखठोक उत्तर
Follow us on

अभिजीत पोते, Tv9 मराठी, पुणे | 29 जानेवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रकट मुलातीचा कार्यक्रम आज पुण्यात आयोजित करण्यात आला. विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संजय राऊतांची मुलाखत घेतली. पुण्यातील जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी संजय राऊतांना त्यांच्या बेधडकपणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. संजय राऊत हे बेधडकपणे आपल्या विरोधकांवर निशाणा साधत असतात. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी संजय राऊतांना तुम्हाला भीती वाटत नाही का? असा प्रश्न विचारला. त्यावर संजय राऊत यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली.

“मी अशा व्यपीठावर पक्षीय कधीच नसतो. गेल्या 40 वर्षात माझ्यावर अनेक शिक्के लागले, कधी पवारांचा माणूस तर कधी काँग्रेसचा माणूस, पण मी शिवसैनिक आहे. मी बाळासाहेबांचाच आहे. मी 40 वर्षांपासून शिवसेनेतच आहे. ज्या माणसाने 40 वर्षे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काढली त्याला भीती कशी वाटेल? आमच्या अनेक लोकांना ईडीने बोलावलं आहे. मी त्यांना फोन केला. बिनधास्त चौकशीला जा. मी पण जाऊन आलोय. मला कधी भीती वाटली नाही. राजकारणात ज्या भयंकर गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या मी केल्या आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.

“आमच्यासाठी शिवसेना हा राजकीय पक्ष नाही किंवा सत्ता घेण्यासाठीचं साधन नाही. भीती बाजूला खुंटीला टांगून ठेवावी लागते. आम्ही आमच्या डोळ्यांनी रक्तपात आणि हिंसाचार पहिला आहे. आपला विरोधक एक तर जेलमध्ये टाकतो किंवा गोळ्या घालतो. हे गेल्या 5 ते 10 वर्षात जास्त होत आहे”, अशी उत्तर संजय राऊत यांनी दिलं.

सुषमा अंधारे यांनी मुलाखतीत विचारलेले प्रश्न आणि राऊतांचे उत्तर

प्रश्न – बाळासाहेब ठाकरे यांची एखादी आठवण सांगा

संजय राऊत – आम्ही बाळासाहेबांचा विश्वास संपादन केला. बाळासाहेबांची काम करण्याची पद्धत वेगळी होती. त्यांना नाही म्हणणं आवडत नव्हतं. आम्ही कारण कधीच सांगत नव्हतो. त्यांना ती आवडत नव्हती. कामगिरी फत्ते करून वापस या अस सांगायचे. बाळासाहेबांसारखा नेता पुन्हा होणे नाही. आजही राजकारणी भरपूर आहेत. पण बाळासाहेब एकच.

प्रश्न – युवा पिढीला राजकारण सशक्त उभं करता येईल? जो माणूस 8 पक्ष फिरून आला त्याच व्यक्तीला पक्षबंदी कायदा पुनर्विचार समिताचा अध्यक्ष कसं केलं जातं?

संजय राऊत -हे अत्यंत भ्रष्ट अधिकाराला अँटी करप्शन ब्युरोचा हेड करण्यासारखं आहे. हम करे सो कायदा असं राज्यात घडत आहे. आधीचे नेते विरोधकांचे ऐकत होते. दुर्दैवाने आज राज्यात तसं नाही. सगळ्या गोष्टी लोकशाहीच्या विरोधात केल्या जात आहेत. मला संसद वाटत नाही तिथं फक्त आवाज दाबला जात आहे. विरोधकांचा आवाज संसदेत दाबला जात आहे. राज्यात पक्ष फोडला, पक्षांतर केलं, घटनेच उल्लंन केलं. केंद्रीय यंत्रणाच्या दबावाने पक्ष फोडले जातात. ज्याने खून केला त्यालाच संपूर्ण खुनी महामंडळाचा अध्यक्ष करत आहात.

प्रश्न: तुमच्यावर अनेक टीका होतात. त्याला उत्तर देताना तुम्ही टोकाने उत्तर देता त्याबद्दल काय सांगाल?

संजय राऊत : माझ्या भाषेत काय आक्षेपार्ह आहे? एकदा माझ्या दातात काहीतरी अडकले म्हणून मी थुंकलो होतो. आता त्या पत्रकाराने त्याचं नाव विचारलं आणि तेव्हा अचानक मला तसं झालं (संजय राऊत यांनी सांगितला “तो” किस्सा)

प्रश्न: तुम्ही राज ठाकरे यांचे मित्र?

संजय राऊत : राज ठाकरे अजूनही माझे स्नेही आहेत. शरद पवार सुद्धा स्नेही आहेत. राहुल गांधी यांच्याशी स्नेह कायम राहतील आणि ओवेसी पण माझे मित्र आहेत. माझे सर्वांशी आणि विशेषतः टीका करणाऱ्यांशी माझे चांगले संबंध आहेत.

प्रश्न: वंचित बहुजन आघाडीशी सेनेचे कसे संबंध आहेत?

संजय राऊत : आंबेडकर यांची शिवसेनेशी आधीच युती झालीय. आता लवकरच महाविकास आघाडीशी होईल. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीची A टीम असतील.

प्रश्न: जरांगे आंदोलन आणि आरक्षण यावर संधिग्तता आहे?

संजय राऊत : एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. पण मी त्यांना नेते मानणर नाही आणि ते नेते नाहीत की महाराष्ट्राने त्यांचं ऐकावं. मुख्यमंत्री भूमिका मांडतात म्हणजे ही सरकारची भूमिका मानली पाहिजे. शिंदे वेगळी तर मंत्री छगन भुजबळ वेगळी भूमिका मांडतात. बेबनाव करणाऱ्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि भुजबळ यांना बरखास्त करावं तर मी तुम्हाला नेता म्हणून मानेल