पुणे : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. विचारवंत आहेत. अभ्यासू नेत्या आहेत. धारदार वक्तृत्वाची देणगी त्यांना लाभलेली आहे. आपल्या वक्तृत्वाने त्या भल्याभल्यांना गारद करत असतात. ठाकरे गटात आल्यानंतर त्यांना जशी प्रसिद्धी मिळाली तशा त्या विरोधकांच्या निशाण्यावरही आल्या. पण सुषमा अंधारे अजिबात डगमगत नाहीत. त्यांची प्रबोधन यात्रा अव्याहतपणे सुरू आहे आणि विरोधकांना त्या सळो की पळो करून सोडत आहेत. कितीही संकट आलं तरी त्या डगमगत नाहीत. कारण त्यांचं स्ट्राँग ऑक्सिजन त्यांच्यासोबत असतं. ते म्हणजे त्यांची लेक कब्बू. अर्थात कबीरा. कबीरा ही त्यांची एनर्जी आहे. त्यामुळेच त्या आपल्या लेकीचं दर्शन अधूनमधून सोशल मीडियावर घडवत असतात. आताही त्यांनी कब्बूचा बालपणीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
सुषमा अंधारे यांनी त्यांच्या फेसबुकवर 2018मधील एक पोस्ट शेअर केली आहे. म्हणजे पाच वर्षापूर्वीची ही पोस्ट आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कब्बू बाबतच्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवाय कब्बूचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. अवघा 47 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत कब्बू बसलेली दिसत आहे. कब्बू अत्यंत छोटी आहे. ससा की ससा… हे गाणं लागलेलं आहे. त्या गाण्यावर कब्बू मान डोलवताना दिसत आहे. बेडवर बसलेली कब्बू काही तरी खाताना दिसत आहे.
या व्हिडीओ खाली अंधारे यांनी एक कॅप्शन लिहिलं आहे. Missing you kabbu… माझं ईटुकलं पिटुकलं पिल्लू… माझ्या या धावपळीत माझ्यापेक्षाही तुझा समजुतदारपणा (समजुतदारपणा हा शब्दही तुला कळत नाही तरी मी तो तुझ्यावर लादतेय का गं…) मोठा… असं कॅप्शन दिलं आहे. सुषमा अंधारे यांनी आपल्या लाडक्या लेकीसाठी या भावना व्यक्त केल्या आहेत. अंधारे यांच्या या पोस्टला प्रचंड लाइक्स मिळत आहेत. तब्बल 11 हजार लोकांनी या व्हिडीओला पाहिलं आहे.
सुषमा अंधारे यांचं आपल्या लेकीवर अफाट प्रेम आहे. त्याची प्रचिती वारंवार येत असते. लेकीसाठी त्यांचा जीव नेहमी खालीवर होत असतो. पक्ष बांधणीच्या कार्यासाठी त्या दिवसे न् दिवस दौऱ्यावर असतात. पण त्यांचं सर्व चित्त आपल्या लेकीकडे लागलेलं असतं. काही दिवसांपूर्वी त्यांच्या लाडक्या कब्बूचा वाढदिवस होता. त्यांना पोहोचायला उशीर होत होता. त्यामुळे सुषमा अंधारे यांच्या जीवाची तगमग होत होती. पण शिवसैनिकांना ही गोष्ट माहीत पडताच त्यांनी सुषमा अंधारे यांच्या घरी धाव घेतली आणि कब्बूचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. स्वत: सुषमा अंधारे यांनी हा किस्सा शेअर केला होता.