पुणे – राज्यात एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. वेगवेगळ्या शहरात कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. पुण्यातील स्वारगेट आणि शिवाजीनगर बस स्थानकात एसटी कर्मचाऱ्यांचे सलग चौथ्या दिवशी आंदोलन सुरु ठेवले आहे. आज आंदोलनाच्या चौथ्या दिवशी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी मुंडन करून महामंडळ व राज्य शासनाचा निषेध केला.
”सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढलाच पाहिजे. हजार -दोन हजार नव्हे तारा जवळपास 92 कर्मचाऱ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. इथं काम करणारे सर्व कामगार हे मराठी आहेत. केवळ मराठा , मराठी माणूस न म्हणता त्याचे हक्क सरकारने त्यांना दिले पाहिजेत . सरकारने आम्हाला न्याय दिला तर त्यांना डोक्यावर घेऊ मात्र न्याय न दिल्यास काय करायचं ते आम्हाला चांगलंच माहित आहे” असा सज्जड इशाराही आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी महामंडळाने शिवाजी नगरमध्ये कर्मचाऱ्यांसाठी असलेले विश्रामगृह खाली केले. कर्मचाऱ्यांचे विश्रामगृहात असलेले सामना बाहेर काढण्यास सांगण्यात आले. स्वारगेट स्थानकातीलआंदोलक कर्मचाऱ्यांचे सामनाही कालरात्री उशीरा बाहेर काढत विश्रामगृह बंद करण्यात आले. आपल्या मागण्यासाठी आधीच आंदोलन करत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये या कृतीमुळे अधिक संताप निर्मण झाला आहे.
”आंदोलन बंद पाडण्यासाठी सरकार हे दडपशाहीचे धोरण अवलंबत आहे. मात्र त्यांच्या कोणत्याही दडपणाला आम्ही बळी पडणार नसल्याची ठाम भूमिका संपातील सहभागी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
एसटीचा दररोज बुडतोय 13 कोटींचा महसूल
कोरोना महामारीमुळ आर्थिक तोट्यात असलेल्या एसटीची घडी या आंदोलनामुळं आणखीच विस्कटली आहे. ऐन दिवाळीच्या सणात कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपामुळे महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोना काळात एसटी महामंडळाला जवळपास 7 हजार 951 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. तर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे जवळपास 100 कोटींचा तोटा महामंडळाला झाला आहे. सद्यस्थस्थिती संपामुळं महामंडळाचा 13 कोटी महसूल बुडत आहे. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळं राज्यातील250 आगार बंद आहेत.
हे ही वाचा:
पुणे गारठले; शहराच्या विविध भागात कडाक्याच्या थंडीसह धुक्याचे प्रमाण वाढले