पुणे – महानगरपालिकेने शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम (Encroachment Removal Campaign)चांगलीच सुरु ठेवली आहे. शहरातल्या वेगवेगळ्या भागातील अतिक्रमण काढले आहे. नागरिकांच्या विरोधाला न झुगारताही क कारवाई केली जात आहे. याबरोबरच आता पुण्यात (Pune)नव्याने समाविष्ट झालेल्या34 गावातील (Villages )अतिक्रमणावरही कारवाई करत ती काढून टाकणार आहेत. या गावांचा महानगरपालिकेत समावेश होणार असल्याचे समजताच अनेकांनी घाईगरबडीत बांधकामे केली आहेत. मात्र महापालिके केवळ 31 डिसेंबर2020 पूर्वी झालेली बांधकामेच अधिकृत धरणार आहे. याबरोबरच नागरिकांना 31 मार्च पूर्वी अनधिकृत बांधकामे ऑनलाइन अर्ज करत अधिकृत करता येणार होती. मात्र ती मुदतही संपली आहे.
महानगरपालिकेतील समाविष्ट गावात अनेकांनी बेकायदेशीर रित्या बांधकाम केली. मात्र जेव्हा ही अनाधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची वेळ आली तेव्हा बांधकाम व्यासायिकांना घाम फुटलेला दिसून आला. बांधकाम अधिकृत करत असताना 2020 पूर्वीचे असल्याचे गुगल मॅप पिक्चर जोडावे लागत होते. त्यामुळे अनेकांची गोची झाली. गुगल मॅपवरील तारीख व बांधकामाची तारीख यामध्ये तफावत आढळून आली. अनेकांनी महापालिका व पीएमआरडीएचे सर्व नियम धाब्यावर बसवून नैसर्गिक जलप्रवाह अडवून, उंच टेकडीवर, ओढ्यांमध्ये, अरुंद जागेत इमारती उभ्या केल्या आहेत. रेरा नुसार कोणत्याही नियमांची अंमलबाजवणी केलेली नाही. अनेक गावातील रस्त्यावरही अतिक्रमणही करण्यातआले आहे. ही सर्व अतिक्रमण महानगरपालिकेकडून काढून टाकण्यात येणार आहे.
अनेक गावात गायरान, सरकारी मालकीच्या जागा वने अशा ठिकाणीही बांधकाम करण्यात आहे. झोपडपट्ट्याही उभारण्यात आल्या आहेत. यासगळ्या बांधकामावर महानगरपालिका लवकरच कारवाईचा बडगा उगारणार आहे.
Video : उत्तरप्रदेशची निवडणूक संपली आणि पेट्रोलचे दर वाढले – प्रकाश आंबेडकर
Video Nagpur school | शाळेत विद्यार्थ्यांना गुढी उभारण्याचे धडे; उद्या सुटी असल्याने आजच उभारली गुढी