पुणे- आगामी महानगरपालिका निवडणुकीची (Municipal elections) लगबग सगळीकडं सुरु झाली आहे. राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पक्षाच्या बांधणीलाही सुरुवात झाली आहे. निवडणुकीसाठीच्या महापालिकेने जाहीर नुकतीच अंतिम प्रभाग रचनेची (Ward List )यादी नुकतीच जाहीर केली आहे. महानगरपालिकेने जाहीर केलेल्या अंतिम प्रभागांच्या यादीमध्ये एकूण 20 प्रभागांच्या नावामध्ये बदल झाला आहे.आगामी निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग या पद्धतीने होणार आहे. पुणे महानगरपालिकेने मार्च महिन्यातच प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर केला होता. त्यावर नागरिकांच्या(Citizen) हरकती व सूचना मागवण्यात आल्या होता. त्यानंतर नुकताच म्हणापलिकने प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा प्रसिद्ध केला आहे. या निवडणुकीसाठी एकूण 58 प्रभाग असून त्यातील 20 प्रभागाच्या नावात बदल झाला आहे.
पूर्व खराडी-वाघोली (प्रभाग क्रमांक4),
पश्चिम खराडी-वडगांवशेरी (प्रभाग क्रमांक 5),
वडगांवशेरी-रामवाडी (प्रभाग क्रमांक 6),
बोपोडी-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (प्रभाग क्रमांक 11),
पंचवटी-गोखलेनगर (प्रभाग क्रमांक 15),
शनिवार पेठ-नवी पेठ (प्रभाग क्रमांक 17),
छत्रपती शिवाजी महाराज मैदान-रास्ता पेठ (प्रभाग क्रमांक 19),
पुणे स्टेशन-मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता (प्रभाग क्रमांक 20),
कोरेगांव पार्क-मुंढवा (प्रभाग क्रमांक 21),
मांजरी बुद्रुक-शेवाळवाडी (प्रभाग क्रमांक 22),
वानवडी गावठाण- वैदुवाडी (प्रभाग क्रमांक 26),
कासेवाडी-लोहियानगर (प्रभाग क्रमांक 27),
महात्मा फुले स्मारक-भवानी पेठ (प्रभाग क्रमांक 28),
महात्मा फुले मंडई-घोरपडे पेठ उद्यान (प्रभाग क्रमांक29),
भुसारी कॉलनी-बावधन खुर्द (प्रभाग क्रमांक 32),
आयडियल कॉलनी-महात्मा सोसायटी (प्रभाग क्रमांक33),
बिबवेवाडी-गंगाधाम (प्रभाग क्रमांक 40),
काळे-बोराटेनगर-ससाणेनगर (प्रभाग क्रमांक 44),
बालाजीनगर-शंकर महाराज मठ (प्रभाग क्रमांक 49),
वडगांव बुद्रुक-माणिकबाग (प्रभाग क्रमांक 51) अशी प्रभागांची नवी नावे आहेत.
प्रभाग रचनेची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता राजकीय पक्षांना आरक्षणाच्या सोडतीकडे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीसाठीया आजी-माजी नगरसेवकांबरोबरच नवीन इकच्छुकांनीही पक्ष नेतृत्वाकडे आपली बाजू लावून धरण्यास सुरुवात केली आहे. आपली उमेदवारी पक्की करण्यासाठी सातत्याने पक्षाच्या डोळ्यासमोर येईल अशी कामे करण्यावर भर दिला जात आहे. मात्र नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार आणि कुणाला नाही हे आरक्षणाची सोडत झाल्यानंतर ठरणार आहे.