पुणे – जिल्ह्यात मद्यपींचे प्रमाण वाढल्याची आकडेवारी उत्पादन शुल्क विभागानं जाहीर केली आहे. देशी व विदेशी मद्याची खरेदी करताना ग्राहकाकडे मद्यखरेदीचा परवाना आवश्यक असतो. मात्र या परवान्याच्या खरेदीकडे मद्यपीकडून फाटा मारला जात असल्याचे समोर आले आहे. वर्षभरात लाखोरुपयांच्या मद्याची विक्री होता असताना परवाने फक्त्त हजारात निघालेले दिसून आले आहे. इतकंच नव्हे तर परवाना घेऊन दारू पिणाऱ्यांची टक्केवारीही अत्यंत नगण्य असल्याचे समोर आले आहे. उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार सन 2020-21-मध्ये पुणे जिल्ह्यात तब्बल 89 लाख लिटर देशी व विदेशी मद्याची विक्री झाली आहे. मात्र या खपाच्या तुलनेत परवाना घेऊन मद्यखरेदी करणारे खूपच कमी आहेत. यामध्ये कायम, स्वरुपीसाठी परवाना घेणारे केवळ 7 हजार 219 लोक आहेत.
मद्यपानाचा नियम काय?
प्रत्येक मद्यपीला मद्याची खरेदी करत असताना त्याच्या मद्य बाळगण्याचा परवाना घेणे बंधनकारक आहे. मात्र अनेकजण याकडे दुर्लक्ष करत मद्याची खरेदी करताता . अनेक मद्यविक्रीच्या ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आलेले परवाने तसेच पडून आल्याचे दिसून आले आहे. एका दिवसासाठी देशीमद्यासाठी 2 तर विदेशी मद्यासाठी पाच रुपये या प्रमाणे परवाना वितरीत केला जातो.
अशी करतात फसवणूक
अनेक मद्यपी मद्याची खरेदी करताना परवाना खरेदी करत नाहीत. दुसरीकडे एक-दोन दिवसांचा परवाना खरेदी केला तर त्यावर तारीख , वार टाकत नाहीत . आपल्या सोयीनुसार त्यावर तारीख व वार टाकतात. यामध्ये 26 जानेवारी, 15 ऑगस्ट , राष्ट्रीय सुट्यांना उत्पादन शुलकविभाग परवाने तपासतात. असे समजून अनेकजण परवाना घेत नाहीत.
मुंबईतील शाळांची घंटा उद्याच वाजणार, पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्याचे आदेश
Video: बादशाहच्या गाण्यावर एअर होस्टेसचे भन्नाट डान्स मुव्ह्ज, नेटकरी आयतच्या अदांवर घायाळ!