पुणे – शहरात मोठ्याप्रमाणत होत असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेमुळे शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या चांगलीच आटोक्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये झालेल्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीनंतर आता शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यास प्रशासनाला यश आले आहे. कोविड रुग्णांची संख्या घटवण्यासाठी पुणे महानगर पालिकेचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत.
आजच्या दिवशी पुण्यात कोरोना संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या शून्य असून पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळं केवळ 2 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दिवस भरात पुण्यात एकूण 69पॅाजिटिव्ह रुग्ण आढळून आले तर दिवसभरात 82 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीला 103 क्रिटिकल रुग्णांवर शहरात उपचार सुरु आहेत. शहरात आतापर्यंत पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 504759 इतकी होती . तर पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 657 एवढी आहे. आतापर्यंत शहरात 9 हजार 77नागरिकांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे . आज एकूण 5 हजार 667 नागरिकांची कोरोना चाचणी(स्वॅब) करण्यात आली आहे.
पुणे कोरोना अपडेट : रविवार दि. ७ नोव्हेंबर, २०२१
◆ उपचार सुरु : ६५७
◆ नवे रुग्ण : ६९ (५,०४,७५९)
◆ डिस्चार्ज : ८२ (४,९५,०२५)
◆ चाचण्या : ५,६६७ (३५,८२,०५०)
◆ मृत्यू : ० (९,०७७)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/TDi7L6rguw— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) November 7, 2021
लसीकरण मोहिम उद्यापासून पुन्हा सुरु
लक्ष्मीपूजन , पाडवा, भाऊबीज व रविवारची साप्ताहिक सुट्टी सलग आल्याने, 4 ते 7 नोव्हेंबरपर्यंत महापालिका केंद्रांवरील लसीकरण बंद ठेवले होते. मात्र उद्या सोमावर (8 नोव्हेंबर) पासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. दिवाळीमुळे 4 ते 7 नोव्हेंबरपर्यंत महापालिका केंद्रांवरील लसीकरण बंद होते. मात्र लसीकरणात खंड पडू नये, यासाठी पालिकेच्या लसीकरण केंद्रावर कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध करून देण्यात आले होते. नागरिकांची गैरेसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली होती.
इतक्या लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण
आतापर्यंत शहरात तब्बल 51 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहेत. 2 नोव्हेंबरपर्यंत 51 लाख 16 हजार 124 जणांना लस देण्यात आली आहे. यामध्ये 32 लाख 3 हजार 402 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर 19 लाख 12 हजार 772 जणांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. शहरात गेल्या दोन महिन्यांपासून लसीकरणाचा वेग वाढला असून प्रत्यक्ष केंद्रावर येऊन लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे.
हे ही वाचा:
‘या सुंदर वास्तूचा लाभ आजारी असतानाही विविध कार्यक्रमांना हजेरी; भरणे यांचे कार्यकर्त्यांवरील प्रेम पुन्हा एकदा चर्चेत
घ्या, मात्र लाभ घेताना भाड नक्की द्या’ का म्हणाले शरद पवार असे? जाणून घ्या एका क्लिकवर
पिंपरी- चिंचवडमध्ये गुंडांचा उच्छाद ; गोंधळ घालत केली वाहनांची तोडफोड