शरद मोहोळचा गेम का झाला? पोलिसांनी सांगितलं नेमकं कारण

| Updated on: Jan 06, 2024 | 3:11 PM

पुण्यामध्ये एक खळबळजनक घटना घडली. ज्यानंतर परिसरात काही वेळ भितीचे वातावरण हे बघायला मिळाले. गुंड शरद मोहोळ याची भर दिवस गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याचे काही सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल झाले. आता या प्रकरणात पोलिसांकडून मोठा खुलासा करण्यात आलाय.

शरद मोहोळचा गेम का झाला? पोलिसांनी सांगितलं नेमकं कारण
Sharad mohol
Follow us on

मुंबई : पुणे शहरात एक मोठी खळबळजनक घटना घडली. ज्यानंतर सर्वत्र खळबळ निर्माण झाली. पुणे शहरात भरदिवसा गोळीबार झाला. तीन हल्लेखोरांनी गुंड शरद मोहोळ याच्यावर भरदिवसा गोळीबार केला. या गोळीबारनंतर शरद मोहोळला रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. आता या प्रकरणात अत्यंत मोठे खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तब्बल आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. या घटनेनंतर पुणे शहरात खळबळ माजली. आता नुकताच या प्रकरणात पोलिसांनी काही मोठे खुलासे केले आहेत.

पोलिसांनी सांगितले शरद मोहोळच्या हत्येचे कारण 

शरद मोहोळ याच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी साहिल पोळेकर असल्याचे आता स्पष्ट झालंय. हेच नाही तर आठ आरोपींपैकी दोन वकिलांचा देखील या हत्येमध्ये सहभाग आहे. शरद मोहोळ याची हत्या वैमनस्यातून आणि जमिनीच्या वादातून झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलंय. अजूनही या प्रकरणात मोठे खुलासे होऊ शकतात.

प्राथमिक तपासात ही हत्या जमिनीच्या वादातून झाल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय. साहिल पोळेकर हा शरद मोहोळ यांच्यासोबत फिरत असत. सावलीप्रमाणे साहिल शरद मोहोळसोबत असतं. हत्येच्या दिवशी देखील तो नेहमीप्रमाणे शरद मोहोळ याच्यासोबतच घरातून बाहेर पडला आणि थेट गोळीबार केला.

अगोदरच रचला हत्येचा कट

शरद मोहोळ याच्या हत्येचा कट अगोदरच रचला गेला. अजूनही या हत्ये प्रकरणात काही मोठे खुलासे हे होऊ शकतात. या हत्ये प्रकरणातील आठही आरोपींना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलंय. शरद मोहोळ आणि आरोपी साहिल पोळेकर यांची घर देखील जवळच होती. घराच्या अगदी जवळच ही भर दुपारी हत्या करण्यात आली.

आरोपींनी शरद मोहोळवर एकून चार गोळ्या झाडल्या. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. शरद मोहोळ याच्यावर गोळीबार होतानाचे काही सीसीटीव्ही फुटेज हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. हल्लेखोर हे अगदी जवळून शरद मोहोळवर गोळीबार करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय.

एकत्र मिळून जेवण आणि…

काल शरद मोहोळ याच्या लग्नाचा वाढदिवस देखील होता. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच शरद मोहोळची हत्या करण्यात आली. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शरद मोहोळ याने एक स्टेटज देखील ठेवले होते. विशेष म्हणजे आरोपींनी शरद मोहोळ याच्या घरी एकत्र मिळून जेवण केले आणि घराच्या बाहेर पडताच हा गोळीबार केला.