पुणे : अंथरुणाला खिळलेल्या आणि विविध व्याधी असलेल्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने घरोघरी जाऊन लसीकरण (Door to Door Vaccination) करण्यासंदर्भात सूचना प्रशासनाल्या दिल्या होत्या. त्यानंतर मुंबईत घरोघरी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेतर्फे (Pune Municipal Corporation) 9 ऑगस्टपासून अंथरुणाला खिळलेल्या आणि शारीरिक हलचाल करू न शकणाऱ्या नागरिकांसाठी विशेष लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. (The Pune Municipal Corporation has launched a special corona vaccination campaign for the bedridden and physically challenged citizens)
या विशेष लसीकरण मोहीमेअंतर्गत लसीकरण केंद्रावर येऊ न शकणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन महापालिकेतर्फे कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी (Online Registration) बंधनकारक आहे. नोंदणी केल्यानंतर आजारपणासंदर्भातली डॉक्टरांची कागदपत्र जोडावी लागणार आहेत. या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर महापालिकेकडून अर्जदाराच्या घरी जाऊन कोवॅक्सिनचा (Covaxin) डोस दिला जाणार आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांना कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस घरी जाऊन देण्यात येणार आहेत त्यासाठी नमूद करण्यात आलेल्या कागदपत्रांची काळजीपूर्वक पूर्तता करून जमा करण्याचं आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं आहे.
अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांच्या लसीकरणासाठी ईमेलवर ऑनलाईन अर्ज करणाचं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे.
संबंधित व्यक्तीचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणाला खिळल्याचे कारण, सदरची व्यक्ती लसीकरणास पात्र असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांचे प्रमाणपत्र आणि त्याच्या नातेवाईकांचे संमतीपत्र ही कागदपत्र लसीकरणासाठी आवश्यक आहेत.
कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पात्र ठरलेल्या व्यक्तींना त्यांच्या घरी दिलेल्या पत्त्यावर तारीख आणि लसीकरणाची वेळ कळवली जाईल. लसीकरण करताना आणि लसीकरण झाल्यानंतर 30 मिनीटे व्यक्तीचे निरीक्षण करण्यासाठी फॅमिली डॉक्टर उपस्थित असणे अपेक्षित आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत कोवॅक्सिन लसीचा डोस देण्यात येणार आहे.
घरोघरी लसीकरणासाठी महापालिकेकडे आतापर्यंत 65 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 50 जणांची कागदपत्रे अपूर्ण आहेत. त्यांच्या महापालिकेकडून पुन्हा संपर्क साधला जात आहे. सध्या जे अर्ज महापालिकेला येतील त्यातून लसीकरणासाठी विभागवार नियोजन करण्यात येणार आहे. कमीत कमी वेळेत लस देता यावी यासाठी ‘वॅक्सिन ऑन व्हिल्स’ या वाहनाचा वापर केला जाणार आहे.
संबंधित बातम्या :