पुणे : मुंबई-पुणे महामार्गावर किवळे इथं अनधिकृत फ्लेक्स पडून पाच जणांचा बळी गेला. त्यानंतर महापालिकेवर चौफेर टीका झाली. जाहिरात फलकांमधून मनपाला उत्पन्न मिळते. पण, काही लोकं अनधिकृत जाहिरात फलक लावतात. यामुळे काही दुर्घटना घडतात. यापूर्वी अशी एक दुर्घटना घडली होत्या. त्यानंतर मनपाने अनधिकृत होर्डिंग्स काढले होते. परंतु, त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली. आला मनपाने या अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात मोठं पाऊल उचललं आहे.
पुण्यामध्ये या घटनेनंतर फ्लेक्सवर कारवाई सुरू झाली. पण पिंपरी चिंचवडमध्ये ती झाली नव्हती. पण अखेर महापालिकेने अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई सुरू केली. शहराच्या विविध भागातील अनधिकृत फ्लेक्स काढण्याचं काम सुरू आहे. शहरात जवळपास 400 हून अधिक अनधिकृत फ्लेक्स आहेत. त्यावर लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे महापालिका अधिकारी अजय प्रधान यांनी स्पष्ट केले.
मुंबई-पुणे महामार्गावर किवळे इथं अनधिकृत फ्लेक्स पडून पाच जणांचा जीव गेला. या घटनेनंतर महापालिकेने अनधिकृत फ्लेक्सवर कारवाईला सुरुवात केली आहे. पिंपरी शहरातल्या विविध भागातील अनधिकृत फ्लेक्स काढण्याचे काम सुरू आहे.
पिंपरी शहरात जवळपास ४०० हून अधिक फ्लेक्स आहेत. त्यावर लवकरच कारवाई केली जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. आतापर्यंत ३७ अनधिकृत होर्डिंग्स जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. उर्वरित अनधिकृत होर्डिंग्स काढण्याचे काम सुरू आहे.
महापालिकेचे अधिकारी म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून शहरात जाहिरात फलकं काढण्याचे काम सुरू आहे. कालपर्यंत ३७ होर्डिंग्स काढलेले आहेत. उर्वरित होर्डिंग्स येत्या दोन दिवसांत काढण्यात येतील. यापुढे अनधिकृत जाहिरात फलकं राहणार नाही, याची काळजी घेण्यात येणार असल्याचंही अधिकारी म्हणाले.