पुणे – शहरात गुन्हेगारीचे प्रमाणात वाढण्याबरोबरच चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. सोनसाखळी चोरी(Looted) घटनांबरोबरच घरफोडीच्या घटना घडत आहेत. राजगुरूनगर (Rajgurunagar) येथे बंद घराचे कुलुप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. राजगुरू नगर येथील तिन्हेवाडी रोड येथे ही घटना घडली आहे. या घटनेत तब्बल साडेनऊ लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी (Thieve)लांबवला आहे. याबाबत अफसाना मोईन कुरेशी यांनी खेड पोलिसात तक्रार दिली आहे.
नेमक काय घडलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या वेळी अफसाना मोईन कुरेशी यांचं घर बंद होते. घर बंद आहे, हे पाहून चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलुप तोडले. त्यानंतर घरात प्रवेश करून घराती लाकडी कपाटाचे कुलूप तोडले. त्यामध्ये ठेवलेली रोख रक्कम दोन लाख सत्तर हजार रुपये, तसेच दोन लाख पंचवीस हजार रुपये किंमतीचे 5 तोळ्याचे सोन्याचे दागिने, 56 हजार रुपये किंमतीचे सव्वा तोळे वजनाचे सोन्याचे मनी मंगळसुत्रासह इतर दागिने असा एकूण 9 लाख 51 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. अफसाना या घरी आल्यानंतर चोरीची घटना त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थाळाला भेट दिली असून उपविभागीय पोलिस अधिकारी सुर्दशन पाटील, पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांनी भेट दिली असुन चोरांच्या तपास करिता पथके करण्यात आली आहे.
मला कोणाच्या दबावाखाली राहायचं नाही, बुमराहसोबतच्या वादानंतर मार्को यान्सिनची प्रतिक्रिया
साखरपुड्यानंतरही गर्लफ्रेण्डशी संबंध, बापाकडून पोराची हत्या, बहीण-आईच्या मदतीने मृतदेह नदीत फेकला
Corona Cases India : देशात 2 लाख 38 हजार नवे रुग्ण, ओमिक्रॉनबाधितांची संख्या 9 हजारांच्या उंबरठ्यावर