Chota Pailwan : अवघ्या दहाव्या वर्षी मारले एक हजार जोर! पिंपरी चिंचवडमधल्या या छोट्या पैलवानाला व्हायचंय हिंदकेसरी..!

| Updated on: May 23, 2022 | 4:13 PM

रेकॉर्ड करायचे असेल तर ते लवकर करावे लागेल, म्हणजे लोक कंटाळणार नाहीत, हा विचार केला आणि तीस मिनिटांच्या आत करण्याचे ठरवले. त्याचा जोरदार सराव केला, असे स्वराज लांडगे म्हणाला.

Chota Pailwan : अवघ्या दहाव्या वर्षी मारले एक हजार जोर! पिंपरी चिंचवडमधल्या या छोट्या पैलवानाला व्हायचंय हिंदकेसरी..!
पुशअप्स मारताना स्वराज लांडगे
Image Credit source: tv9
Follow us on

पिंपरी-चिंचवड : अवघ्या दहा वर्षीय पैलवानाने (Pailwan) सलग 1 हजार जोर मारून भीमपराक्रम केला आहे. त्याच दहा वर्षीय पैलवानाचे आता पंचक्रोशीत कौतुक सुरू आहे. स्वराज राहुल लांडगे (Swaraj Landge) असे या लहानग्या पैलवानाचे नाव असून त्याने एका दमात 1 हजार जोर मारले आहेत. हा भीमपराक्रम त्याने केवळ 26 मिनिटे 51 सेकंदात केला आहे. यावेळी हिंदकेसरी (Hind Kesari) विजेता अमोल बुचडे उपस्थित होते. लहान वयात स्वराजला हिंदकेसरी बनवण्याचे वडील राहुल यांचे स्वप्न आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये हा पराक्रम नोंद करण्याचा स्वराजच्या कुटुंबीयांचा प्रयत्न असणार आहे. मागील अनेक दिवसांपासून स्वराजचे प्रयत्न सुरू आहेत. तो यासाठी परिश्रमही घेत आहे. त्यात आता त्याने हा आगळावेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे.

‘अजून रेकॉर्ड करायचे आहेत’

अवघ्या दहा वर्षांचा स्वराज मात्र त्याच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या आहेत. मागील आठ महिन्यापासून परिश्रम घेत आहे. पाच-पाचने मी वाढवत गेलो. 26 मिनिटे 51 सेकंदांत हे रेकॉर्ड त्याने केले. सराव करत असताना खूप वेळ लागत होता. पण रेकॉर्ड करायचे असेल तर ते लवकर करावे लागेल, म्हणजे लोक कंटाळणार नाहीत, हा विचार केला आणि तीस मिनिटांच्या आत करण्याचे ठरवले. त्याचा जोरदार सराव केला, असे स्वराज लांडगे म्हणाला.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाला स्वराज लांडगे?

‘हिंद केसरीची गदा जिंकायची आहे’

करोनाच्या काळात अनेक मुले मोबाइलवर गेम खेळत होते. परंतु, स्वराज हा पहाटे उठून जोर मारण्याचा सराव करत होता. स्वराजला मोठे होऊन मल्ल व्हायचे आहे. शिवाय वडिलांचे नाव मोठे करून हिंद केसरीची गदा जिंकायची आहे. स्वराजने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 1 हजार जोर मारलेत. दरम्यान, यावेळी हिंदकेसरी विजेता अमोल बुचडे, पैलवान आमदार महेश लांडगे आदी उपस्थित होते. त्यांनी त्याला प्रोत्साहन देत शुभेच्छाही दिल्या. भविष्यात ही अशीच कामगिरी केल्यास तो त्याचे स्वप्न पूर्ण करेल, यात काही शंका नाही.