प्रदीप कापसे, पुणे दि. 25 नोव्हेंबर 2023 | सरकारी नोकरी हे विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. त्यासाठी विद्यार्थी वर्षानुवर्ष रात्रंदिवस एक करतो. अनेक जण कुठे छोटी-मोठी नोकरी करुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेसाठी तयारी करतात. जागा कमी आणि लाखो अर्ज अशी परिस्थिती असते. यामुळे एमपीएससीकडून घेण्यात येणारी प्रत्येक परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असते. परंतु एमपीएससी बोर्ड विद्यार्थ्यांची परीक्षा पाहत असल्याचे दिसून येत आहे. एमपीएससी बोर्डाने पुन्हा गोंधळ तयार निर्माण केला आहे. एकाच दिवशी तीन परीक्षा होणार आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या दोन संधी वाया जाणार आहेत. एसपीएससीच्या तीन परीक्षा १७ डिसेंबरला एकाच दिवशी होत आहे.
एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या गट क क्लार्क, टॅक्स सहायक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदाची परीक्षा एकाच दिवशी आली आहे. या तिन्ही परीक्षा १७ डिसेंबरला एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्येक परीक्षा वेगवेगळ्या तारखांना घेण्याची मागणी केली आहे. मंडळ वेळापत्रक तयार करताना एकाच दिवशी तीन परीक्षांचे आयोजन कसे करते? मंडळाकडून विद्यार्थ्यांचा काहीच विचार होत नाही का? असे प्रश्न विद्यार्थी विचारत आहे.
राज्य लोकसेवा आयोगामार्फत उत्तीर्ण झालेल्या कृषी विभागातील २०३ उमेदवारांची मागील सहा महिन्यांपासून नियुक्ती करण्यात आली नाही. परीक्षा उत्तीर्ण झालेले हे कृषी पदवीधर सध्या बेरोजगारीचा सामना करत आहे. एकीकडे राज्य सरकार ७५ हजार जागा भरण्याची घोषणा करते तर दुसरीकडे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संधी देत नाही. यामुळे सरकारविरूद्ध आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, अशी व्यथा एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी मांडू लागले आहेत.
शेतकरी कुटुंबातील मुलांनी प्रचंड संघर्ष करून राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यातून २०३ उमेदवार परीक्षेच्या अंती निवडीस पात्र ठरले आहेत. यातील उमेदवारांची नियुक्ती ही कृषी उपसंचालक तसेच मंडळ व तालुका कृषी अधिकारी पदावर करण्यात येणार आहे. परीक्षेचा निकाल लागून सहा महिने झाले. त्यानंतर नियुक्ती पत्र नाही.