पुणे – दिवाळीनंतर शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढली होती. मात्र यामध्ये घसरण होताना दिसून आली आहे. आज शहरात 45 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर तब्बल 85 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 3 हजार 222 जणांची तपासणी करण्यात आली. या तपासणीच्या तुलनेत बधितांची टक्केवारी1.39 टक्के इतके असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शहरातील एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही. मात्र पुण्याबाहेरील २ जण दगावले आहेत. शहरातील विविध रूग्णालयांत सध्या 98 गंभीर रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 77 रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.
आतापर्यंतची आकडेवारी काय सांगते
हवामान बदलामुळ साथीचे आजार
दुसरीकडे शहरात सातत्याने होत असलेल्या हवामान बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. सर्दी ताप, खोकला हे लक्षणे असलेले रुग्णही वाढत आहेत.साथीचे आजराही पसरत आहेत. या बदलत्या वातावरणात नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन पालिकेनं केले आहे.
बारामतीतील अभिषेक ननवरे वयाच्या 18व्या वर्षी ठरला ‘आयर्नमॅन’
महाविकास आघडीनं दंगेखोरांना पाठीशी घातलं- जगदीश मुळीक ; भाजपने धरणे आंदोलन करत व्यक्त केला निषेध
पुढील दोन दिवस पुण्यात पाऊस, हवामान खात्याची माहिती; अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका