पुणे: कोरोनाच्या संकटाशी झुंज सुरू असतानाच आता म्युकर मायकोसिसने राज्यात थैमान घातले आहे. पुणे जिल्हा तर म्युकर मायकोसिसचा हॉटस्पॉट ठरला असून पुण्यात आतापर्यंत या आजाराने 20 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासन खडबडून जागं झालं असून रुग्णालयांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. (total 1275 black fungus cases reported in Pune)
राज्यात पुणे जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे म्युकर मायकोसिसच्या रुग्णसंख्येत पुणे जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. पुण्यात आतापर्यंत 318 जणांना म्युकर मायकोसिसची लागण झाली असून 20 जणांचा बळी गेला आहे. त्याशिवाय आतापर्यंत 1257 जणांना म्युकर मायकोसिसची बाधा झाली आहे. राज्यातही म्युकर मायकोसिसचा प्रकोप वाढू नये म्हणून राज्यातील सर्व रुग्णालयांसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आल्याचं राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं.
दरम्यान, म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर उपचारासाठी ससून रुग्णालयात स्वतंत्र वार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. पालकमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आदेश दिल्यानंतर ससून रुग्णालयात वार्ड तयार करण्यात आला आहे. 50 ऑक्सिजन बेड आणि 10 आयसीयू बेड आणि स्वतंत्र ऑपरेशन थिएटरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तर कोरोना आणि म्युकर मायकोसिसच्या रुग्णासाठी 10 ऑक्सिजन बेड आणि 5 व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था तयार करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातही म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात या आजारामुळे 12 रुग्ण दगावले आहेत. तर दोन दिवसात 70 रुग्ण दाखल झाले आहेत. यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रोज 3 रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयांमध्येही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. शहरातील सर्वात मोठ्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या 12 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेनं दिलीय. तर दोन दिवसांत 70 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयांमध्येही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र, महापालिकेकडे नेमके किती खासगी रुग्णालयं आहेत, याची माहिती उपलब्ध होऊ सकली नाही. (total 1275 black fungus cases reported in Pune)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 18 May 2021 https://t.co/WYR5i0iwyn #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2021
संबंधित बातम्या:
लहान मुलांसाठी सर्वाधिक धोकादायक आहे 2021 चा कोरोना, महाराष्ट्रात 60,684 मुले कोरोना संक्रमित
कोरोनामुक्त मधुमेहींना म्युकोरमायकोसिसचा धोका, लक्षणं कोणती? आजार टाळण्याचे उपाय काय?
Mucormycosis : म्युकरमायकोसिसची भीती वाटतेय? मग ICMR ने सुचवलेल्या ‘या’ गोष्टी कराच…
(total 1275 black fungus cases reported in Pune)