लोणावळा, पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune expressway) वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. मुंबईवरून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर (Lane) वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. तर वाहनाची संख्या वाढल्याने अमृतांजन पुलाजवळ (Amrutanjan Bridge) वाहनांची (Vehicles) प्रचंड मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे आधीच उन्हाने बेजार झालेल्या नागरिकांना आणखी ताप झाला आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटक बाहेर पडलेत खरे, पण वाहतूक कोंडीने त्यांना वेढले आहे. लोणावळा, महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटक बाहेर आल्यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहनांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. दुपारची वेळ असल्याने बराचसा वेळ या धिम्या वाहतुकीतच जात असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले आहे.
उन्हाळा सुरू असल्याने थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची पावले वळतात. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, गुड फ्रायडे अशा सलग सुट्ट्या असल्याने पर्यटकांनी हा मुहूर्त साधला आहे. मुंबईहून पुण्याकडे येत असताना मात्र महामार्गावर ही कोंडी पाहायला मिळत आहे.
#Pune : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटक बाहेर पडले आहेत.#lonavala #tourists #expressway #TrafficJamz
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmH04UAs pic.twitter.com/fh6cn8yUu3— TV9 Marathi (@TV9Marathi) April 14, 2022