रणजित जाधव, पुणे : पुणे शहरात वाहतूक कोंडी (Pune Traffic Issue) ही एक गंभीर समस्या बनली आहे. पुण्यात जिथे जाल तिथे तुम्हाला वाहतूक कोंडीच्या समस्या असते. मग शनिवार, रविवारी पुणे-मुंबई अन् मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या लोकांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसतो. शनिवारी सकाळी पुन्हा मुंबईच्या बाजूला वाहतूक कोंडी झाली आहे. अमृतांजन पुलाजवळ वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोडींमुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं चित्र आहे. त्यामुळे मोठा टोल भरुन एक्स्प्रेस वे वरुन प्रवास करणाऱ्या लोकांचा वेळ वाया जात आहे.
मुंबई- पुणे हायवेवर वाहतूक कोंडी झाली आहे. लोणावळा येथील बोरघाटात वाहतुकीची कोंडी झाली आहे. घाटातील अमृतांजन पुलाजवळ वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाली.
पुणे मुंबई महामार्गवर पुन्हा वाहतूक ठप्प#Pune #expressway #Mumbai pic.twitter.com/nVYlN7aPxW
— jitendra (@jitendrazavar) June 10, 2023
का झाली वाहतूक कोंडी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर सुट्या आल्या की वाहतूक कोंडी होण्याचा प्रकार नेहमी घडत असतो. आता पुन्हा शनिवार आल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. शनिवार असल्याने मुंबईकर घराबाहेर पडले आहे. अनेक जण पर्यटनासाठी लोणावळा, खंडाळा गाठत आहे. तर काही जण पुण्याला जात आहे. मोठ्या संख्येने वाहने रस्त्यांवर आल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे.
संथ गतीने वाहतूक
विकेंड आल्यामुळे पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात वाहतूक संथ गतीने सुरू आहे. बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ वाहनांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. विकएंडचा आनंद लुटण्यासाठी आणि आपल्या गावी जाण्यासाठी बाहेर पडलेले लोक वाहतूक कोंडीत अडकले आहेत. बोरघाटात महामार्ग पोलिस रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहेत.
टोल वाढला पण…
या महामार्गावर टोल वाढवण्यात आला आहे. परंतु वाहतूक कोंडीतून कायमस्वरुपी तोडगा काढण्यात आला नाही. दर आठवड्याला शनिवारी आणि रविवारी वाहतूक कोंडी होत असते. साप्ताहिक सुट्यांमुळे पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे ही कोंडी होते. यामुळे शनिवारी अन् रविवारी एक्स्प्रेस वे फक्त नावालाच एक्स्प्रेस असतो.
देशात सर्वाधिक टोल
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 2004 ला हा टोल सुरू करताना दर तीन वर्षांनी 18% दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार टोलच्या दरात 18 टक्के वाढ 1 एप्रिल 2023 पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे या महामार्गावरुन जाताना आता वाढीव टोल देऊन प्रवास करावा लागणार आहे. परंतु ही दरवाढ देशात सर्वाधिक आहे. राष्ट्रीय महामार्गावर प्रतिकिलोमोटीर 1.73 रुपये टोल कारसाठी आकारला जातो. तो मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर तब्बल 3.40 रुपये प्रतिकिलोमीटर आहे. इतका टोल देशात कुठेही नाही.