पुणे | 21 जुलै 2023 : पुणे शहरातील वाहतूक हा मोठा गहन प्रश्न आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर पुणेकरांना वाहतूक कोंडीचा अनुभव नेहमी येत असतो. यामुळे दोन, चार किलोमीटर आंतर जाण्यासाठी बऱ्याचवेळा तासभर जातो. परंतु आता पुणे शहरातील वाहतूक स्मार्ट होणार आहे. वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार आहे. त्यासाठी नवीन प्रणाली बसवण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसांत ही प्रणाली सुरु होणार आहे.
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशने स्मार्ट सिग्नल प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली एडटीव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ATMS) म्हणून ओळखली जाते. यामध्ये कॅमेरा आणि सेन्सरचा उपयोग करुन वाहतूक नियंत्रित केली जाते. सिग्नल प्रणालीत विशिष्ट टाईम सेट केलेला असतो. परंतु ATMS प्रणालीत कॅमेरा आणि सेन्सॉरच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रित केली जाईल. ज्या ठिकाणी कमी वाहने असतील त्या ठिकाणी सिग्नल लवकर ग्रीन होईल ज्या ठिकाणी जास्त वाहने आहेत, त्या ठिकाणी जास्त कालावधी ठेवले, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांनी सांगितले.
ATMS प्राणली येत्या १५ दिवसांत ९५ सिग्नलवर बसवली जाणार आहे. त्यासाठी आधी या ठिकाणावरचा डाटा तयार केला आहे. त्यासाठी नियंत्रण कक्ष तयार केले गेले आहे. त्यासाठी सिंहगड रोडवरील स्मार्ट सिटीच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष तयार केला गेला आहे. या प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेने ५८ कोटी रुपयांचा निधी स्मार्ट सिटीला दिला आहे.
ATMS प्रणाली रुग्णवाहिका, पोलीस गाडी, अग्निशामन दल यांना सरळ ग्रीन सिग्नल मिळणार आहे. या प्रणालीमुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. तसेच प्रदूषणाची पातळी कमी होणार आहे. पुणेकरांचा वेळ वाचणार आहे. कमी वेळेत पुणेकरांना घरी किंवा कार्यालत जात येणार आहे. संपूर्ण शहरात ही प्रणाली ९५ ठिकाणी बसवली आहे. त्यानंतर संपूर्ण शहरात बसवली जाणार आहे.