विनय जगताप, भोर, पुणे | 29 जुलै 2023 : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. पुणे घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त आहे. या पावसामुळे घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. यामुळे पुणे आणि रायगड प्रशासनाने वरंधा घाट रस्ता बंद केला आहे. वरंधा घाट बंद केल्यानंतर ताम्हिनी घाटाचा पर्याय वाहन धारकांना आहे. परंतु प्रशासनाचा आदेश मोडून काही जण धोकादायक पद्धतीने वरंधा घाटातून प्रवास करत आहे. यामुळे शनिवारी मोठा अपघात या ठिकाणी झाला.
पुण्याहून वरंधघाट घाट मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर कार नीरा देवघर धरणाच्या पाण्यात कोसळली. या कारमधून तिघे जण प्रवास करत होते. कार धरणात कोसळल्याची घटना समजताच स्थानिक रेस्क्यू टीम रवाना झाली आहे. या कारमधील तिघांसंदर्भात अजून काही माहिती उपलब्ध झालेली नाही. रेस्क्यू टीमच्या ऑपरेशननंतर यासंदर्भातील अधिक माहिती मिळणार आहे. परंतु वरंधघाट मार्ग बंद असताना ही कार गेली कशी? हा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे.
पुणे घाट माथ्यावर दोन, तीन महिने पाऊस जोरदार असतो. पावसामुळे घाटात दरडी कोसळत असतात. वृक्ष उन्मळून पडणे, रस्ता खचून असे प्रकार होत असतात. तसेच माती वाहून जाणे असाही प्रकार होतो. यामुळे वरंधा घाट बंद करुन ताम्हिनी घाटाचा पर्याय वाहनधारकांना दिला आहे. परंतु वरंधा घाटातून प्रवास कमी वेळेत होतो त्यामुळे अनेक जण पुन्हा धोकादायक असणारा हा मार्ग अवलंबत आहे.
पुणे वरंधा घाटातील रस्ता 22 जुलै ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बंद केलेला आहे. याबाबत आदेश पुणे आणि रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहे. घाटाच्या सुरुवातील अडथळे म्हणून मातीचे ढिगारे लावून सूचनाही लिहिली आहे. त्यानंतर काही वाहनधारक धोकादायक पद्धतीने जात असल्याची बातमी टीव्ही-९ मराठीने यापूर्वीच दिली होती.
ही ही वाचा
पुणे घाटात प्रशासनाने दोन ठिकाणी केला रस्ता बंद, परंतु धोकादायक पद्धतीने वाहनधारकांकडून वाहतूक