पुणे : दौंड शहरातील दोन अल्पवयीन मुले भीमा नदीपात्रात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. ही दोन्ही मुलं अंघोळ करण्यासाठी नदीपात्रात गेली होते. पाण्याचा अंदाज न आल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. (two minor boys drowned in bhima river of daund taluka in pune district)
मिळालेल्या माहितीनुसार दौंड शहरातील दोन मुले भीमा नदीवर अंघोळ करण्यासाठी गेली होती. ही दोन्ही मुले अंघोळ करण्यासाठी नदीपात्रात उतरले होते. मात्र अंघोळ करत असताना या दोन्ही मुलांना पाण्याच अंदाज आला नाही. परिणामी दोघेही पाण्यात बुडाले.
या घटनेची माहिती होताच नदीशेजारील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. लोकांनी पाण्यात बुडत असलेल्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुले खोल पाण्यात गेल्यामुळे त्यांना वाचवण्यात अपयश आले आणि दोघांचाही मृत्यू झाला. ही दोन्ही मुले एकमेकांचे नातेवाईक आहेत. या घटनेमुळे दौंड शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पाहा व्हिडीओ :
दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्यामुले भीमा नदीच्या तिरावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मुलं बुडाल्यामुळे दौंड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने शोधमोहीम रावबली. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांनतर दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
इतर बातम्या :
देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील एकाच गाडीत, व्यासपीठावरही गुजगोष्टी! फडणवीस काय म्हणाले?
‘आयुष्याशी खूप त्रस्त झालोय’, पत्नीला संपवत तरुणाची आत्महत्या, अवघ्या 11 दिवसांचं बाळ पोरकं
कोण आहेत सुनिल जाखड, ज्यांचं नाव पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक आघाडीवर आहे? वाचा सविस्तर
IPL 2021 च्या उर्वरीत सामन्यांसाठी मुंबई इंडियन्समध्ये धुरंदर अष्टपैलू दाखल, रणजी चषकात हॅट्रीक घेण्याचा कारनामा https://t.co/YmqZU3Jebd#IPL2021 | #MIvsCSK | #Mumbaiindians
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 18, 2021
(two minor boys drowned in bhima river of daund taluka in pune district)