Pune : पुणे शहरात अटक केलेल्या दहशतवाद्यांचा ‘ट्रूकॉलर’मुळे झाला भांडाफोड

| Updated on: Jul 22, 2023 | 1:17 PM

Pune Crime News : पुणे शहरात दोन दहशतवाद्यांना तीन दिवसांपूर्वी अटक झाली होती. हे दहशतवादी दीड वर्षांपासून फरार होते. एनआयएने त्यांच्यावर पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. ते नेमके पोलिसांच्या जाळ्यात कसे आले...

Pune  : पुणे शहरात अटक केलेल्या दहशतवाद्यांचा ट्रूकॉलरमुळे झाला भांडाफोड
Follow us on

पुणे | 22 जुलै 2023 : पुणे शहरात बुधवारी दोन दशतवादी पकडले गेले. ते शहरात दीड वर्षांपासून राहत होते. जयपुरात सीरियल ब्लास्ट करण्याचा कटामधील ते आरोपी होते. त्यांच्यावर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत त्यांचा समावेश केला होता. पुणे शहरात दीड वर्षांपासून ते राहत असतानाही पोलिसांना त्याची माहिती मिळाली नव्हती. ते पोलिसांना कसे सापडले, ही बाबही आता समोर आले आहे.

कसे सापडले पोलिसांना

कोथरुड पोलीस ठाण्याचे कर्मचारी अमोल नाजन आणि प्रदीप चव्हाण १८ जुलै रोजी गस्त घालत होते. त्यावेळी दुचाकी वाहनाच्या चोरी करण्याचा प्रयत्नात असणाऱ्या दोघांना त्यांनी पकडले. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार फरार झाला. या दोघांची चौकशी सुरु केली असता त्यांनी त्यांची नावे हिंदू सांगितले. परंतु त्यांचा फोननंबर ट्रू कॉलरमध्ये टाकल्यावर त्यांची इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी हे नाव समोर आले. तिसरा साथीदार मोहम्मद शहनवाज (वय ३२) फरार झाला होता. त्यांच्या घराची तपासणी केली असता काडतूस, पिस्तूल आणि इतर आक्षेपार्ह साहित्य सापडले. त्यांचा लॅपटॉप जप्त केला.

एनआयच्या रडारवर होते

राजस्थानमध्ये बॉम्ब स्फोट घडवण्याचा कटात एनआयएच्या रडारवर हे दोघे होते. दीड वर्षापासून ते फरार होते. त्यामुळे एनआयएने पाच लाखांचे बक्षीस त्यांच्यावर जाहीर केले होते. आयसिसी या दहशतवादी संघटनेची शाखा असलेल्या सुफा संघटनेशी ते संबंधित होते. दोघांची एटीएस आणि एनआयएकडून कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे. या दोघांच्या अटकेनंतर पुणे पोलिसांनी घरमालकांना भाडेकरुची माहिती देणे बंधनकारक केले आहे. अन्यथा घरमालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

रतलाममध्ये छापे

दोन्ही आरोपी मुळचे मध्य प्रदेशातील रतलामधील आहे. शुक्रवारी एटीएसच्या टीमने त्यांच्या घरी जाऊन पंचनामा केला. त्यांच्या संपत्तीची माहिती घेतली. एटीएसच्या चार अधिकारी यासाठी रतलाममध्ये पोहचले होते.

ही ही वाचा

हा नियम पाळा, अन्यथा घरमालकांवर गुन्हा दाखल होणार, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय