पुणे : उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, युवासेना पदाधिकारी आज नियुक्त करण्यात आले. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन आम्ही जाणार आहोत. शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेले आहेत. दोन तास मनापासून काम या पदाधिकारी यांनी केले तर पुढे जाऊ शकतो. विकास काय करणार हीच प्राथमिकता आहे. महाराष्ट्राचा विकास कसा करणार हे जनतेला सांगितलं तर महत्त्वाचे आहे.
जर हल्ला झाला तर तो चौकशी व्हायला पाहिजे. असे हल्ला मीपण अनुभवला आहे. मी सेनेमध्ये काम करत असताना सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून केले आहे. ठाकरे कुटुंबावर संपत्तीवर माझी कधीही नजर नव्हती.
दाऊद हा महाराष्ट्राचाचं नाही देशाचा दुश्मन आहे. जी कारवाई केली आहे या संदर्भात माझ्याकडे माहिती नाही. मला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही, असा टोला उदय सामंत यांनी विनायक राऊत यांना लगावला.
दिवाळी किटबाबत उदय सामंत म्हणाले, त्या किटवर असलेले स्टिकर हे शासनाचा एक प्रोटोकॉल आहे. इतक्या वर्षात अशी योजना कोणीही आणली नव्हती. सरकारची किट देण्याची दानत आहे. मात्र, ते का पोहचले नाहीत याची तपासणी करणार आहोत. ते थोडे फार मागे पुढे झाले असेल पण हे दिले जाईल, असं आश्वासतन त्यांनी दिलं.
काँग्रेसबद्दल उदय सामंत यांनी सांगितलं की, सगळ्या पक्षाची काम करण्याची पद्धत आहे. जी काही निवडणूक घेतली ती व्यक्ती वरिष्ठ आहेत. त्यांना शुभेच्छा आहेत काँग्रेस पुढे काय करेल हे ते ठरवतील.
उदय सामंत म्हणाले, आधी युवासेनेचे बैठक करायचा तेव्हा 25-30 लोक पण नसायची. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात संघटन करण्यास वेगळीचं मजा आहे. शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय योग्य होता हे आता कळत आहे. कात्रजला मेळावा घेणार आहोत. 100 दिवसात केलेले काम या मेळाव्यात मांडणार आहोत.
बाळासाहेबांची शिवसेना पुण्यामध्ये वाढवल्या शिवाय राहणार नाही. टीका करताना पातळी जपा; भावी पिढीला राजकारणाबद्दल तिरस्कार वाटू नये. काही लोकं म्हणाली ग्रामपंचायतीत माझा सुफडा झाला. जोपर्यंत तुम्ही सोबत तोपर्यंत माझा सुफडा साफ करणारा जन्माला यायचाय. ग्रामपंचायतीमध्ये एक नंबरला भाजपा आहे. दोन नंबरला बाळासाहेबांची शिवसेना आहे.