Unique wedding story| अनोख्या लग्नाची गोष्ट ; शिरूरमध्ये 73 वर्षीय वडील व 68  वर्षीय आई अडकले लग्नाच्या बेडीत

| Updated on: Feb 23, 2022 | 4:34 PM

आई वडील नेहमी त्यांना त्यांच्या जून्या दिवसांचे धडे देत होते.तसेच समाजामध्ये वावरत असताना होणारे विविध धार्मिक कार्यक्रम पाहून आपल्या आई वडिलांचा बाबतीत असा कोणताच आनंदाचा कार्यक्रम कधी झाला नसल्याची सल या चारही भावंडांमध्ये होती. त्यामुळे त्यांनी आपल्या आई वडिलांचा लग्नाचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या थाटात करत आई वडिलांचा पुन्हा विवाह करण्याचा निर्णय चारही मुलांनी घेतला.

Unique wedding story| अनोख्या लग्नाची गोष्ट ; शिरूरमध्ये 73 वर्षीय वडील व 68  वर्षीय आई अडकले लग्नाच्या बेडीत
Unique wedding story
Follow us on

सुनिल थिगळे,  शिरुर– लग्न (wedding ) म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचा आनंदी क्षण मात्र काहींना आपल्या लग्नामध्ये हौस मौज करणे शक्य नसते.  परंतु पुणे (Pune) जिल्हातील एका कुटुंबाने आपल्या 73  वर्षीय वडील व 68 वर्षीय आईच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त त्यांचा पुन्हा पूर्णपणे वैदिक पद्धतीने विवाह करत साजरा केला. आई वडिलांना पन्नास वर्षानंतर एक अनोखी भेट दिल्याचे पाहायला मिळाले, पुण्याच्या शिरूर (Shirur)तालुक्याच्या शिक्रापूर येथील प्रसिद्ध छायाचित्र कार अतुल थोरवे यांच्या आई माणिकबाई व वडील रामदास यांचा १९७२ सालच्या दुष्काळात विवाह झाला होता. दुष्काळ असल्याने त्यांचा विवाह हा सध्या पद्धतीने झाला. त्यांनतर या दाम्पत्याने पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून कष्टाने संसार उभा करून आपल्या दोन मुले, दोन मुलींचे शिक्षण करत त्यांचाही संसार उभा करून दिला.आपल्या आई वडिलांच्या कर्तृत्वाची जाणीव त्यांच्या चारही मुलांना आहे. यातूनच त्यांनी आई वडिलांच्या ;लग्नाचा पन्नासावा वाढदिवस थाटत साजरा करायचा ठरवले.

अन पुन्हा विवाह करण्याचा निर्णय घेतला

आई वडील नेहमी त्यांना त्यांच्या जून्या दिवसांचे धडे देत होते.तसेच समाजामध्ये वावरत असताना होणारे विविध धार्मिक कार्यक्रम पाहून आपल्या आई वडिलांचा बाबतीत असा कोणताच आनंदाचा कार्यक्रम कधी झाला नसल्याची सल या चारही भावंडांमध्ये होती. त्यामुळे त्यांनी आपल्या आई वडिलांचा लग्नाचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या थाटात करत आई वडिलांचा पुन्हा विवाह करण्याचा निर्णय अविनाश थोरवे, अतुल थोरवे, वैशाली आदक, अर्चना येन्धे या चारही मुलांनी घेतला. आणि वर्हाडी मंडळी सह मोठ्या थाटात हा विवाह समारंभ पार पडला

आई – वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला

पुन्हा एकदा आई-वडिलांचा वाजत गाजत विवाह सोहळा साजरा केला.साखरपुडा , हळदी समारंभ ते थेट बिदाई असा अनोखा कार्यक्रम केला मोठी वरात ही काढण्यात आली यावेळेस आई वडिलांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला या लग्न समारंभानंतर संपूर्ण थोरवे कुटुंब भाउक झाल्याचे पाहायला मिळाले.मात्र मुलांनी एवढ्या मोठ्या उत्साहात पुन्हा विवाह सोहळा साजरा केल्याने आईला व वडिलांना एक अनोखी भेट दिली असल्याचे आई माणिकबाई यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांची मुले, मुली, नातू पाहुणे मित्र मंडळ मोठ्या संख्येने हजेरी लावली खरी..मात्र थोरवे कुटुंबीयांचा हा आनंद पाहून आपल्याही आई वडिलांना असा आनंद देण्याचा मोह कुणालाच आवरणार नाही हे मात्र तितकेच खरे.

Nawab Malik | यूपीत जन्म, भंगारवाला, 25व्या वर्षी पहिली निवडणूक, मंत्री ते ईडीची अटक! मलिकांच्या 25 मोठ्या गोष्टी

VIDEO : लुडो गेमवरुन चर्चगेट लोकलमध्ये प्रवाशांची हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Janhavi Kapoor Photos : जान्हवी कपूर वांद्र्यातील जीमबाहेर स्पॉट, पाहा फोटो…