पुणे : भारतीय रेल्वेचा विस्तार वेगाने होत आहे. वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे नेटवर्क वाढत आहे. या रेल्वेला चांगली मागणी आली आहे. पुणेकरांसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहे. परंतु ही रेल्वे मुंबई ते सोलापूर (Mumbai-Pune-Solapur Route) आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ पुणे रेल्वे स्टेशनवरुन सरळ कोणत्याही शहरात जात नाही. परंतु आता ही अडचण दूर होणार आहे. लवकरच पुणे शहरातून थेट वंदे भारत ट्रेन सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यामुळे लवकरच पुण्याहून वंदे भारत एक्स्प्रेसने थेट दुसऱ्या राज्यापर्यंत जाणार आहे.
कशी धावणार ट्रेन
तिरुपती ते हैदराबाद अशी वंदे भारत एक्स्प्रेस आहे. यापूर्वी वंदे भारत एक्सप्रेस सिकंदराबाद ते विशाखापट्टणम दरम्यान चालवली जात होती. आता आणखी दोन शहरे हैदराबादला वंदे भारत एक्स्प्रेसने जोडण्यात येणार आहे. यापैकी एक ट्रेन हैदराबाद ते बंगळुरूपर्यंत धावणार आहे. तर दुसरी पुणे ते सिकंदराबाद अशी असणार आहे. यामुळे पुणे शहर थेट हैदराबादला वंदे भारत एक्सप्रेसने जोडला जाणार आहे.
पुणे सोलापूर किती झाली कमाई
सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांनी चांगलीच पसंती दिलीय. मागील पंचेचाळीस दिवसात तब्बल 50 हजार प्रवाशांनी वंदेभारत एक्स्प्रेसने प्रवास केलाय. 45 दिवसांमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसने चार कोटी रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न कमविले आहे. सोलापूर ते पुणे आणि पुणे ते मुंबई यां पल्ल्यात 100 टक्के तर सोलापूर ते मुंबई या पल्ल्यात 70 टक्के लोकांनी प्रवास केलाय. लवकरच उन्हाळी सुट्टी सुरु झाल्यानंतर गाडीचे बुकिंग अधिक होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केलाय.
काय आहेत सुविधा
हे ही वाचा
वंदे भारत एक्स्प्रेस चालवणारी पहिली महिला आहे तरी कोण, मुंबई-पुणे मार्गावर चालवली एक्स्प्रेस