Vande Bharat : थेट पुणे शहरातून वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार, काय आहेत हालचाली

| Updated on: Sep 04, 2023 | 2:08 PM

vande bharat express : मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सध्या सुरु आहे. ही रेल्वे पुण्यातून जाते. परंतु पुणे शहरातून थेट दुसऱ्या शहरात जाण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस अजून नाही. आता पुणे शहरातून थेट वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे.

Vande Bharat : थेट पुणे शहरातून वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार, काय आहेत हालचाली
Follow us on

पुणे | 4 सप्टेंबर 2023 : देशात वंदे भारत एक्स्प्रेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे विविध ठिकाणांवरुन या गाड्या सुरु करण्याची मागणी होत आहे. आता वंदे भारत एक्स्प्रेस शयनयान श्रेणीत सुरु होणार आहे. पुणे शहरातून अजून एकही वंदे भारत एक्स्प्रेस थेट सुरु नाही. मुंबई ते सोलापूर चालणारी वंदे भारत एक्स्प्रेस पुण्यावरुन जात आहे. परंतु आता ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ पुणे रेल्वे स्टेशनवरुन थेट सुरु होणार आहे. यासंदर्भात हालचाली सुरु झाल्या आहे. यामुळे पुण्याहून वंदे भारत एक्स्प्रेसने थेट दुसऱ्या राज्यापर्यंत जाता येईल.

आता कुठे सुरु होणार वंदे भारत

पुणे ते हैदराबाद वंदे भारत सुरु करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी झाला होता. पुणे-सिकंदराबाद अशी शताब्दी एक्स्प्रेस सुरु आहे. त्याऐवजी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे दोन माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील शहरे एकमेकांशी जोडले जाणार आहे. या वंदे भारत ट्रेनची ट्रायल झाली आहे. त्याचवेळी आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होण्याची शक्यता आहे. पुणे ते भोपाळ या मार्गावर ही ट्रेन सुरु होणार आहे. त्यासाठी भोपाळमध्ये तयारी सुरु झाली आहे.

45 कोटी खर्च करणार

भोपाळमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसची देखरेख ठेवण्यासाठी 45 कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. या रक्कमेतून भोपाळ रेल्वे स्टेशनच्या यार्डमध्ये दोन पिट लाईन तयार केली जाणार आहे. ही लाईन अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या कॅमटेक डिझाइनने होणार आहे. यामुळे कोचच्या प्रत्येक भागावर लक्ष ठेवता येणार आहे. तसेच त्रुटी सहज लक्षात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

राज्याला मिळणार सहावी ट्रेन

महाराष्ट्रातून सध्या पाच ठिकाणी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहे. पहिली ट्रेन मुंबई गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाली होती. त्यानंतर मुंबई-सोलापूर, मुंबई शिर्डी आणि मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्या आहेत. आता पुणे हैदराबाद आणि पुणे भोपाळ या ट्रेन सुरु झाल्यास राज्यातून धावणाऱ्या गाड्यांची संख्या सहा होणार आहे.