VIDEO: कंगना रणावत खरी बोलली, स्वातंत्र्य भिकेत मिळालंय; विक्रम गोखलेंकडून कंगनाचं समर्थन

| Updated on: Nov 14, 2021 | 4:01 PM

देशाला 1947मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती, असं खळबळजन विधान अभिनेत्री कंगना रणावतने केलं आहे. कंगनाच्या या विधानावर देशभरातून संताप व्यक्त होत असतानाच अभिनेते विक्रम गोखले यांनी मात्र कंगनाच्या या विधानाचं समर्थन केलं आहे.

VIDEO: कंगना रणावत खरी बोलली, स्वातंत्र्य भिकेत मिळालंय; विक्रम गोखलेंकडून कंगनाचं समर्थन
vikram gokhale
Follow us on

पुणे: देशाला 1947मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती, असं खळबळजन विधान अभिनेत्री कंगना रणावतने केलं आहे. कंगनाच्या या विधानावर देशभरातून संताप व्यक्त होत असतानाच अभिनेते विक्रम गोखले यांनी मात्र कंगनाच्या या विधानाचं समर्थन केलं आहे. कंगना खरी बोलली. तिच्या मताशी मी सहमत आहे. स्वातंत्र्य भिकेत मिळालं आहे, अशा शब्दात विक्रम गोखलेंकडून कंगनाचं समर्थन करण्यात आलं आहे.

पुण्यात एका कार्यक्रमात विक्रम गोखले यांनी कंगनाच्या या विधानाचं समर्थन केलं आहे. भीक मागून स्वातंत्र्य मिळालं असं कंगना म्हणालीय. तिच्या या म्हणण्याशी मी सहमत आहे. हे स्वातंत्र्य दिलेलं आहे बरं का, असं गोखले म्हणाले. तसेच ज्या योद्ध्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या योद्ध्यांना फाशी जाताना त्यावेळचे मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांनी या योद्ध्यांना वाचवलं नाही. आपल्या देशातील हे लोक ब्रिटिशांविरोधात उभं राहत आहेत हे माहीत असूनही त्यांना वाचवलं नाही. असेही लोक त्याकाळी आपल्या राजकारणात होते. भरपूर वाचलं आहे मी, असंही त्यांनी सांगितलं.

युतीसाठी पुढाकार घेणार

यावेळी त्यांनी शिवसेना-भाजपला एकत्रं येण्याचं आवाहनही केलं. या दोन्ही पक्षांना एकत्रं आणण्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांना फॉलोअर्स असतील त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या आघाडीसाठी पुढाकार घाययला हवा, मी घेतोय पुढाकार, असं त्यांनी सांगितलं.

लोकांना फसवू नका

अडीच वर्ष शिवसेनेला दिले असेल तर काय बिघडलं असतं असा प्रश्न मी एकदा फडणवीसांना विचारला होता. त्यातही आधीची अडीच वर्ष तुम्हाला हवी की नंतरची हवी? असा सवालही मी त्यांना केला होता. त्यावर चूक झाली असं फडणवीस मला म्हणाले होते, असा दावाही त्यांनी केला. तसेच खरं तर ही एकट्या फडणवीसांची चूक नाही. त्यांच्यात जे काही झालं होतं, त्याबाबत त्यांनी जनतेला विश्वासात घ्यायला हवं होतं. लोकांना फसवू नका तुम्ही. लोक केव्हा तरी प्रचंड शिक्षा करतात. ती आता आपण भोगत आहोत, असं ते म्हणाले.

डोकी जागेवर ठेवून काम करा

मी तोंड दाबण्याने बांधून घेत नाही. त्यामुळेच मी कोणत्याही राजकीय पक्षांना बांधिल नाहीये. मी फाडफाड बोलणारा माणूस आहे. मी वरचे आदेश बिदेश झुगारुन देतो. जे लोक पक्षाचं काम करतात त्याबद्दल मी त्यांना काही बोलत नाही. पक्षाचं काम सगळेच करतात. पण मोदी जेव्हा देशासाठी उभं राहतात तेव्हा ते माझे आदर्श नायक असतात. जाणीवपूर्वक आपआपली डोकी जागेवर ठेवून काम करा. पुन्हा एकदा माझी प्रामाणिक इच्छा आहे. आता जे चाललं आहे त्यातून बाहेर पडून भाजप-शिवसेनेने एकत्रं आले तर फार बरं होईल, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Naxal attack in Bihar: नक्षलवाद्यांकडून 4 जणांना घराबाहेर फाशी, घर उडवले

Bengal Violence: बंगालमध्ये राजकीय हिंसाचार सुरूच, मेदिनीपूरमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या, तृणमूलवर आरोप

MP: पंतप्रधान मोदींच्या स्वागतापूर्वी राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह 110 मंत्री, आमदारांचा RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य