पुणेकर पाणी जपून वापरा, गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद

| Updated on: Oct 19, 2021 | 11:33 AM

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. गुरुवारी म्हणजेच २१ ऑक्टोबरला संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. स्थापत्य विषयक दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होणार आहे. पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ही माहिती दिली आहे.

पुणेकर पाणी जपून वापरा, गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद
Water
Follow us on

पुणे : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. गुरुवारी म्हणजेच 21 ऑक्टोबरला संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्याबाबतची माहिती पुणे महापालिकेने जारी केली आहे. त्यामुळे पुणेकरांना जरा जपून पाणी वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. कारण, गुरुवारी शहरात संपूर्ण पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

स्थापत्य विषयक दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती आहे. तर शुक्रवारी कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होणार आहे. पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ही माहिती दिली आहे.

गेल्या महिन्यानही पुण्यात पाणीपुरवठा बंद होता. 21 सप्टेंबर रोजी पुण्याच्या उत्तरत पूर्व भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तशी माहिती देण्यात आली होती. लोहगाव, वडगाव शेरी, विमाननगर, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुले नगर, येरवडा, धानोरी, तसंच नगर रस्त्याच्या काही भागाचा पाणीपरवठा बंद होता. भागा-आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या तातडीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.

पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, पुणेकर निर्धास्त!

पुणे जिल्ह्यातील धरणं काठोकाठ भरल्याने आता पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंताही मिटली आहे. त्यामुळे आगामी काळात पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याचा धोका टळला आहे. पाऊस आणखी काही दिवस सुरु राहणार असल्याने शेती आणि इतर कामांसाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल.

खडकवासला भरलं, मुठेचं पात्र दुथडी भरुन वाहू लागलंय

खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु केल्याने मुठा नदीचं पात्र दुधडी भरुन वाहू लागलंय. शहराच्या मध्यवर्ती भागातील भिडे पुलाला पाणी लागलंय. नदीपात्रावरील रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने नदीपात्रात सुरु असलेल्या मेट्रोच्या कामाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

मुळशी धरणातूनही पाणयाचा विसर्ग

मुळशी धरणात सध्या 94% पाणीसाठा असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वीजगृहातून सरासरी 2000-2300 क्युसेक्स ने पश्चिमेकडे विसर्ग चालू केला आहे. पाणलोट क्षेत्रातील पर्ज्यन्याचा कल पाहता सांडव्यातून मुळा नदीमध्ये विसर्ग आवश्यकतेप्रमाणे आज अथवा उद्या सोडण्यात येईल.

संबंधित बातम्या :

नागपूरकरांची चिंता मिटली, पाणीपुरवठा करणारी दोन्ही धरणे ओव्हरफ्लो, पाणी टंचाईपासून सुटका

पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! उत्तर पूर्व भागाचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार