VIDEO: तुम्ही जर म्हटलं आम्हाला रेल्वे चालवायला द्या, तर त्याचीही केंद्राची तयारी आहे; रावसाहेब दानवेंचं मोठं विधान

| Updated on: Sep 25, 2021 | 4:11 PM

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केंद्र सरकारने रेल्वेच्या खासगीकरणाचा मार्ग स्वीकारल्याचं मोठं विधान केलं आहे. तुम्ही जर म्हटलं आम्हाला रेल्वे चालवायला द्या, तर त्याचीही आमची तयारी आहे, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. (we are ready to railways privatization, says Union Minister Raosaheb Danve)

VIDEO: तुम्ही जर म्हटलं आम्हाला रेल्वे चालवायला द्या, तर त्याचीही केंद्राची तयारी आहे; रावसाहेब दानवेंचं मोठं विधान
raosaheb danve
Follow us on

पुणे: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केंद्र सरकारने रेल्वेच्या खासगीकरणाचा मार्ग स्वीकारल्याचं मोठं विधान केलं आहे. तुम्ही जर म्हटलं आम्हाला रेल्वे चालवायला द्या, तर त्याचीही आमची तयारी आहे, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. (we are ready to railways privatization, says Union Minister Raosaheb Danve)

रावसाहेब दानवे पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी हे विधान केलं. वंदे भारत’ नावाच्या एक हजार एक्सप्रेस आता रेल्वेच्या सेवेत येणार आहेत. चेन्नईत या रेल्वे तयार होत आहे. मी पाहणी करून आलो. चांगले डबे आणि चांगली सेवा द्यायची आहे. पण रेल्वे चालवायची असेल तर पैसा कुठून आणायचा? भाडे तर वाढवू शकत नाही. आता काही रेल्वे आम्ही’ खासगीत चालवायला देत आहोत. समजा पाटलांनी आज बाईक घेतली आणि त्यांनी उद्या म्हटलं दानवे मला रेल्वे चालवायची आहे. मीच भाडं वसूल करेल त्याचं. तर तेही द्यायला तयार आहोत, असं सांगतानाच दोन रेल्वे खासगी कंपनीला चालवायला दिल्याचंही दानवे यांनी सांगितलं.

सरकारमध्ये स्कोप

रेल्वेत बसल्यावर विमानात बसल्यासारखं वाटतं. पण भाडंही जास्त द्यावं लागतं. चांगलं बसायला पाहिजे पण भाडं कमी पाहिजे आता असाही कन्सेप्ट आलाय. त्यामुळे नवनवीन कल्पना करणारी माणसं पुढे आली तर मोठ्या प्रमाणावर या सरकारमध्ये स्कोप आहे. राज्यात केंद्रात सरकारमार्फत अनेक योजना सुरू आहेत त्याचा लाभ घ्या, असं आवाहन त्यांनी केलं.

रेल्वेला 60 हजार कोटींचा तोटा

रेल्वेचं नुकसान कमी करण्यासाठी रेल्वेनं काही योजना आणल्या आहेत. रेल्वे तोट्यात आहे. कोविडमध्ये रेल्वेला 60 हजार कोटींचा तोटा झाला आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनवरच इतर उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यात येणार आहे. रेल्वे कँटीन भाड्याने देणार आहोत. तसेच सोलर पॅनल लावायला देणार आहे. ई-बाईक चार्जिंग सेंटरला जागा देणार आहोत. काही रेल्वेगाड्या तर आम्ही खासगी कंपन्यांना चालवायला दिल्या आहेत. सद्यस्थितीत आम्ही रेल्वे प्रवासी भाडं वाढू शकत नाही म्हणून उत्पन्न वाढवण्यासाठी खासगीकरणाचा पर्याय स्वीकारतोय, असं त्यांनी सांगितलं.

दानवेंचा भन्नाट सल्ला

सध्या पेट्रोल दर 100 पार झाल्याने आता ई-बाईकच परवडते. इंधनाचे दर हे आता आंतरराष्ट्रीय बाजारातून ठरतात आणि हे धोरण मोदींनी नाहीतर काँग्रेस सरकारने ठरवलं आहे. हे ग्राहकांनी लक्षात घ्यावे, असं ते म्हणाले. ई बाईकवरचा जीएसटी केंद्राने कमी केला आहे. ई बाईकला सायलन्सरच नाही त्यामुळे गाडीचा आवाजच येत नाही. त्यामुळे तरूणाईमध्ये ई बाईकची क्रेझ कमी आहे म्हणून या बाईकही आवाज मारतील असं काहीतरी करा, असा भन्नाट सल्लाही दानवेंनी दिला. (we are ready to railways privatization, says Union Minister Raosaheb Danve)

संबंधित बातम्या:

VIDEO: आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे, देवेंद्र फडणवीसांचं माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मोठं विधान

क्लास-बिसची भानगड नाय, बसल्या बैठकीला 10 तास अभ्यास, UPSC चं चक्र परळीच्या ‘अभिमन्यू’ने सहज भेदलं!

सावित्रीने शिकवलं, म्हणून तुम्ही अथर्वशीर्ष वाचताय, OBC हक्क परिषदेत छगन भुजबळांचा हल्लाबोल

(we are ready to railways privatization, says Union Minister Raosaheb Danve)