Monsoon : मान्सून आला…मान्सून आला म्हणजे नेमके काय? कसे समजते मान्सून आला

| Updated on: Jun 09, 2023 | 12:30 PM

Monsoon : केरळमध्ये मान्सून आल्याची घोषणा गुरुवारी झाली. परंतु मान्सून म्हणजे आहे तरी काय...मान्सूनचा पाऊस आला हे कसे समजते, भारतीय हवामान विभाग कोणत्या निकषांवर मान्सूच्या आगमनाची घोषणा करते...जाणून घेऊ या

Monsoon : मान्सून आला...मान्सून आला म्हणजे नेमके काय? कसे समजते मान्सून आला
monsoon
Follow us on

पुणे : अंदमान आणि निकोबार बेटांवर दरवर्षी 15 ते 20 मे दरम्यान मान्सूनचा पाऊस सुरू होतो. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून केरळच्या किनारपट्टीवर पाऊस सुरू होतो. मात्र, मान्सून घोषित करण्यासाठी काही निकष आहेत. या आधारे भारतीय हवामान खाते देशात मान्सून आल्याची घोषणा करते. आता केरळमध्ये 8 जून रोजी मान्सून दाखल झाला आहे. हा मान्सून 9 जून रोजी तामिळनाडू, कर्नाटकात पोहचणार असल्याचा अंदाज आहे. परंतु मान्सून आल्याची घोषणा हवामान विभाग कोणत्या निकषांवरुन करते, ते जाणून घेऊ या…

कोणती आहेत निकष

  • केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हवामान खात्याची 14 स्टेशन आहेत. 10 मे नंतर या स्थानकांवर सलग दोन दिवस किमान 2.5 मिमी पाऊस झाला, तर मान्सून दाखल झाल्याचे मानले जाते. ही 14 स्थानके आहेत- मिनिकॉय, अमिनी, तिरुवनंतपुरम, पुनालूर, कोल्लम, अलाप्पुझा, कोट्टायम, कोची, त्रिशूर, कोझिकोड, थलासेरी, कन्नूर, केसरगोड आणि मंगळुरू.
  • वेस्टर्न डिस्टर्बन्समध्ये हवेचा दाब 600 हेक्टोपास्कल असावा. म्हणजे वारे कमी उंचीवरुन वाहायला हवेत. त्याची दिशा विषुववृत्ताच्या उत्तरेकडे हवी. ही वारे मान्सूनला भारताकडे खेचतात. मान्सूनला ढकलणारा वारा 5 ते 10 अंश उत्तर अक्षांश आणि 70-80 अंश रेखांश असावा. त्याचा वेग ताशी 28 ते 37 किलोमीटर असावा.
  • उपग्रहाकडून प्राप्त झालेल्या डेटामध्ये ओएलआर मूल्य (पृथ्वीचा पृष्ठभाग, महासागर आणि वातावरणातून किती उष्णता सोडली जात आहे) 200 डब्ल्यू प्रति चौरस मीटरपेक्षा कमी असावा. त्याची दिशा 5 ते 10 असावी. ते उत्तरेकडे आणि 70 ते 75 अंश पूर्वेकडे असावे.

कधी वेळेवर कधी उशिरा…

हे सुद्धा वाचा

उशीरा आणि लवकर मान्सून दोन्ही असामान्य नाहीत. 2017 मध्ये 30 मे रोजी मान्सूनचे आगमन झाले. 2018 मध्येही 29 मे रोजी प्रवेश केला होता. 2020 मध्ये मान्सून योग्य वेळी आला. यापूर्वी 2019 मध्ये, हवामान खात्याने 6 जून रोजी मान्सूनचे आगमन होणार असल्याचे म्हटले होते. परंतु प्रत्यक्षात 8 जून रोजी केरळमध्ये मान्सून आला.

मान्सून तिसऱ्यांदा 8 जून रोजी केरळमध्ये

मान्सूनला केरळमध्ये दाखल होण्याची 8 जून ही आवडती तारीख दिसत आहे. तिसऱ्यांदा मान्सून याच तारखेला केरळमध्ये दाखल होत आहे. यापूर्वी 2016 आणि 2019 मध्ये मान्सून केरळमध्ये याच तारखेला दाखल झाला होता. यासंदर्भात ट्विट हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसळीकर यांनी केले आहे.