पुणे – सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर जिल्ह्यातील बाजारात बैलांची आवक वाढली आहे. बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यानंतर शर्यतीच्या खोंडांना असलेल्या मागणीत घट झाली होती. मात्र बंदी उठताच मागणीत पुन्हा तेजी आलेली दिसून आली आहे. बाजारात शर्यतीसाठी गोऱ्ह्या बैलांना मागणी वाढली आहे.
या भागातून येतात येतात बैल
बाजारात बैल विक्रीसाठी संगमनेर, लासलगाव , नाशिक, कल्याण, बीड,उस्मानाबाद या तालुका व जिल्ह्यातून शेतकरी व व्यापारी बैलांच्या विक्रीसाठी येतात. बैल बाजारात गावठी, म्हैसुरी, खिल्लारी व पंढरपुरी बैल विक्रीसाठी येत असतात. यासगळ्यामध्ये गोऱ्हा जातीच्या बैलांना अधिक मागणी आहे. बैल बाजारात गावठी बैलाचे भाव ४५ ते ५० हजारांपर्यंत आहेत. गोऱ्हांचे भाव साधारणपणे ३० हजारांच्या पुढे होती. लाखो रुपयांची उलाढाल झालेली दिसून येते. या बाजारात जवळपास ४५७ बैलांची आवक झाली, तर ३६४ बैलांची विक्री झाली.
शेतीमधील बैलांचा वापर संपुष्टात
आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम बैलांच्या खरेदीवर झाला आहे. शेतीतील वापर कमी झाल्याने शेतकरीही बैलांच्या सांभाळण्याचा खर्च पेलत नाही. त्यामुळे बैलजोडी सांभाळण्यासाठी येणारा खर्च सांभाळणं शक्यता होत नाही. मात्र बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. पुन्हा एकदा बैल पाळून त्याची विक्री करण्याकड भर देताना दिसून येत आहे.
बजेट 2022 : ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांना मिळणार 50 हजार, अर्थसंकल्पात घोषणा?
धक्कादायक! प्रवाशांनी कॅब चालकाला लुटले, मारहाणीत चालक जखमी, पोलिसांनी आरोपींना ‘अशा’ ठोकल्या बेड्या