पुण्यात एका अल्पवयीन राजकुमाराने आपल्या पोर्शे कारने बाईकवर सवार दोन जणांना उडवल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सध्या देशात चर्चेत आहे. कारण अशा घटना वाढत आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत दोन इंजिनिअर तरुण-तरुणीचा जीव घेतलाय. आपल्या आलिशान पोर्श कारने त्यांना चिरडले. हे प्रकरण जेव्हा माध्यमामध्ये आले तेव्हा दबाव वाढला. स्वत: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात जात याची माहिती घेतली आणि पत्रकार परिषद घेऊन माहिती देखील दिली.
अल्पवयीन मुलाला जामीन मिळाल्याने लोकांनी यावर नाराजी व्यक्ती केली. या प्रकरणात पोलिसांनी मुलाच्या वडिलांना अटक केली. ज्या पोर्शे कारने या दोन जणांना बळी घेतला ती गाडी कोणती कंपनी बनवते. कोण आहे या कंपनीचा मालक?
पोर्श ही एक जर्मन कंपनी आहे. त्याचे मुख्यालय देखील जर्मनी येथेच आहे. फोक्सवॅगन ग्रुपची पोर्शे एजी ही लक्झरी कार आहे. कार कंपनी विविध प्रकारचे मॉडेल तयार करते. यामध्ये स्पोर्ट्स कार, एसयूव्ही आणि सेडानचा समावेश आहे. हे ड्रायव्हिंगच्या विविध गरजा पूर्ण करतात.
फर्डिनांड पोर्श यांनी 1931 मध्ये या कंपनीची स्थापना केली होती. त्यांनी स्वतःचा अभियांत्रिकी डिझाइन स्टुडिओ स्थापन केला. फर्डिनांड पोर्श यांनी अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी डिझाइन तयार केले. मर्सिडीज-बेंझचाही यात समावेश होता. 1938 मध्ये त्यांनी फोक्सवॅगन टाइप 1 (बीटल) कारची रचना केली, जी दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये सर्वात लोकप्रिय कार बनली. 1948 मध्ये, पोर्शने आपली पहिली कार, 356 सादर केली. ती दोन आसनी स्पोर्ट्स कार होती. जी ॲल्युमिनियम बॉडीसह डिझाइन केली होते. 356 मॉडेल खूप यशस्वी झाले. यामुळे पोर्शला स्पोर्ट्स कार उत्पादक म्हणून स्थापित करण्यात मदत झाली.
अनेक मोठ्या लोकांकडे पोर्शे कार आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी ती खरेदी केली आहे. या गाड्यांची एक्स-शोरूम किंमत 1.61 कोटी रुपयांपासून ते 2.44 कोटी रुपयांपर्यंत आहे.