Who is Baba Adhav : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्याने महविकासआघाडीने ईव्हीएममध्ये घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. असं असतानाच अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये काहीतरी गडबड झाल्याचा आरोप करत ९४ वर्षीय बाबा आढाव उपोषणाला बसले आहेत. ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याने महायुतीचा विजय झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी पुण्याच्या फुले वाड्यात आंदोलन सुरू केलंय. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली.
निवडणूक निकालाच्या प्रक्रियेवर अनेकांनी शंका घेतल्या आहेत. त्यांची शंका दूर करण्याचं काम सरकारचं असल्याचं आहे. सरकार जर ते करत नसेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवल्या शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. असं म्हणत बाबा आढाव यांनी आंदोलनाला सुरुवात केलीये.
लोकसभा आणि विधानसभेच्या निकालात इतका फरक कसा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मतदानात काहीतरी गडबड असल्याचा संषस त्यांनी व्यक्त केला आहे. म्हातारा झालो म्हणून डोळेझाक करायची का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारचं वर्तन हे भयानक आहे. विधानसभा निवडणुकीत असा कोणता चमत्कार झाला असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केलाय.
लोकशाहीची मूल्य उद्ध्वस्त होत असल्याचं म्हणत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी गुरुवारी आत्मक्लेश आंदाेलन सुरु केलंय. आज त्यांच्या आंदोलनाचा हा तिसरा दिवस आहे. आढाव यांच्या आंदोलनाला विरोधी पक्षाकडून पाठिंबा दिला जात आहे. विरोधी पक्षाचे नेते त्यांची भेट घेत आहेत.
94 वर्षाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाल्याचा आरोप ही केला आहे. निवडणुकीच्या आधी पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे हा भ्रष्टाचार असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांनी आज बाबा आढाव यांची भेट घेतली. आज उद्धव ठाकरे हे देखील बाबा आढाव यांची भेट घेणार आहेत. त्याआधी काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम, नाना पटोले यांनी देखील आंदोलनाला पाठिंबा दिला.
डॉ. बाबा आढाव हे पुणे महापालिकेचे १९७० च्या दशकात नगरसेवक राहिलेत. ते समाजवादी पक्षाचे सदस्य होते. रिक्षा पंचायतीचे नेते म्हणूनही त्यांनी काम केलंय. एक गाव एक पाणवठा ही मोहिम त्यांनी सुरु केली होती. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून आता त्यांची ओळख आहे. सध्या ते 94 वर्षांचे आहेत.