पुणे : लावणी कलावंत गौतमी पाटील (Gautami Patil) हिने विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची माफी मागितली. लावणी सर्वांना पाहता यावी. अशी सादर करावी, अशी सूचना अजित पवार यांनी केली होती. गौतमी पाटील हिनं अजित पवार यांची माफी मागितली आहे. गौतमी पाटील म्हणाली, दादा खूप मोठे आहेत. मी त्यांना काही बोलू शकत नाही. दादा जसं म्हणतील तसं. फक्त मला एकचं म्हणायचं आहे की, मी कुठं चुकतेय. जे चुकलं त्यावेळी माफी मागितली होती. तिथून पुढं माझ्याकडून काही चूक झाली नाही.
गौतमी पाटील म्हणाली की, मी व्यवस्थित डान्स केला. तरीही परत मलाचं ट्रोल (Troll) का केलं जाते. चूक झाली. मी माफी मागितली. सर्वांनी माफ केलं. तरीही मला ट्रोल केलं जातं. काही लोकं मला बोलतात. मला एकटीलाच का ट्रोल केलं जातं, असा प्रश्न तिनं उपस्थित केला.
गौतमी पाटील लावणीचे कार्यक्रम सादर करते. तिच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आपल्या गावात व्हावा, असा प्रयत्न असतो. पण, तिला विरोधही तेवढाच होता. तिच्या गाण्यावर अश्लिलतेचा आरोप केला जातो.
नुकताच पुणे जिल्ह्यातल्या बहीरवाडी येते लावणीचा कार्यक्रम होता. प्रेक्षकांनी गौतमीला भरभरून प्रतिसाद दिला. मात्र, काही तरुणांनी तिच्या कार्यक्रमात धूडगूस घातला. त्यामुळे कार्यक्रम थांबविण्याची वेळ आली. महिलांनी हातात काठ्या घेऊन तरुणांना शांत केले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात तिचा कार्यक्रम झाला.
गौतमीच्या कार्यक्रमांना गर्दी होत असली, तर तिच्या कार्यक्रमांना विरोधही तेवढाच होतो. गौतमीला ट्रोल केलं जातं. त्यामुळं मलाच ट्रोल का केलं जातं, असा सवाल तिनं विचारला आहे.
गौतमीचा घुंगरु हा आगामी सिनेमा आहे. या सिनेमातील पहिली लावणी प्रेक्षकांच्या नुकतीच भेटीला आली. मी करते तुम्हाला मुजरा, असं या लावणीचे नाव आहे. ही लावणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या लावणीतील दिलखेचक अदांनी तिनं लक्ष वेधून घेतलं आहे.