अभिजीत पोते, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : चंद्रकांत पाटील यांची पाटीलकी चांगलीच चर्चेत आली. आपला भाऊ पोलीस पाटील असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं. हे सांगताना आपण मुळ जावळीचे मोरे असल्याचं ते म्हणाले. माझं आडनाव काय, हे मी माझ्या वडिलांना विचारत होतो. त्यांनी सांगितलं, आपण जावळीचे मोरे. मग मी त्यांना विचारलं आपण पाटील कसे झालो. आपल्या घरात सातत्यानं पोलीस पाटीलकी राहिली म्हणून आपण पाटील झालोत. या वक्तव्यामुळं चंद्रकांत पाटलांची पाटीलकी पुन्हा एकदा चर्चेत आली.
पुणे पोलिसांच्या एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील उपस्थित होते. कोरोना काळात पुणे पोलिसांनी केलेल्या कामाचं ते कौतुक करत होते. पण, बोलता बोलता चंद्रकांत दादांनी आपलं कुळ आणि मुळ सांगून टाकलं.
कोरोनाकाळात अनेक पोलीस पाटलांनी जीवावर उदार होऊन काम केलं. काही पोलीस पाटलांचे प्राणही गेले. यावेळी बोलताना आपला भाऊदेखील पोलीस पाटील असल्याचं सांगून टाकलं.
कोल्हापूर जिल्हात खानापूर नावाचं २२ शे लोकसंख्येचं गाव आहे. त्या गावचा पोलीस पाटील माझा सख्खा चुलतभाऊ आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात टिकणार आरक्षण मराठा समाजाला मिळालं. त्यामुळं फोडाफोडीचं राजकारण करण्याचा मुद्दा नाही.
चंद्रकांत दादा हे मराठा आहेत का. याची व्हॅलिडीटी काय, असा सवाल विरोधक विचारत आहेत. चंद्रकांत दादांबद्दल अनेक प्रश्न महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निर्माण झाल्या आहेत. दादांच्या इतिहासाशी काही देणघेणं नाही. पण, याची सत्यता समोर यावी, असं विरोधक म्हणताहेत.