पुणे हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपी प्रदीप कुरुलकर याच्यावर देशद्रोहाचे कलम का नाही? कारण आले समोर

| Updated on: Jul 27, 2023 | 3:41 PM

Pune News Honey Trap : पुणे शहरात उघड झालेले हनी ट्रॅप प्रकरणात प्रदीप कुरुलकर याच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. परंतु त्याच्यावर देशद्रोहाचे कलम लावले गेले नाही. याबाबत प्रथमच माहिती बाहेर आली आहे.

पुणे हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपी प्रदीप कुरुलकर याच्यावर देशद्रोहाचे कलम का नाही? कारण आले समोर
pradeep kurulkar
Image Credit source: tv9 Marathi
Follow us on

पुणे | 27 जुलै 2023 : पुणे येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर सध्या येरवडा कारगृहात आहे. पाकिस्तानी गुप्तहेर महिलेच्या हनी ट्रॅपमध्ये ते अडकले होते. झारा दासगुप्ता नावाच्या महिलेस कुरुलकर यांनी देशाची गोपनीय माहिती दिली, हा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी त्याच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे. परंतु देशद्रोहाचे कलम लावले गेले नाही. हे कलम लावण्याची मागणी संभाजी ब्रिगेड आणि काँग्रेससह काही संघटनांनी केली होती. त्यासाठी आंदोलनही केले होते. आता या प्रकरणात देशद्रोहाचे कलम का लावले नाही? याची माहिती एसटीएसचे महासंचालक सदानंद दाते यांनी दिली आहे.

न्यायालयात दोषारोपपत्र

प्रदीप कुरुलकर याला मे महिन्यात हनी ट्रप प्रकरणात अटक झाली होती. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे देण्यात आला. एटीएसने तपास करुन पुणे न्यायालयात दोन हजार पानांचे दोषारोपपत्र प्रदीप कुरुलकर याच्याविरोधात दाखल केले आहे. या दोषारोपपत्रात अनेक धक्कादायक आरोप प्रदीप कुरुलकर याच्यावर आहे. प्रदीप कुरुलकर याने पाकिस्तानी महिलेशी केलेले चॅट समोर आले. प्रदीप कुरुलकर त्या महिलेस बेवी म्हणत होता. तिने झारा दासगुप्ता हे नाव सांगितले होते.

का देशद्रोहाचे कलम लावले

एटीएसने या प्रकरणी दोन हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. तरीही त्यांना प्रदीप कुरुलकर याची पॉलीग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर चाचणी करायची आहे. ही चाचणी करण्यास परवानगी मिळावी, यासाठी एटीएसने न्यायालयात परवानगी मागितली आहे. त्यावर २ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान प्रदीप कुरुलकर यांच्यावर देशद्रोहाचे कलम का लावले नाही, यासंदर्भात बोलताना सदानंद दाते म्हणाले की, आम्ही सरकारी वकिलांशी याबाबत चर्चा केली. सरकारी वकिलांनी हे कलम लावण्यास विरोध केला. यामुळे प्रदीप कुरुलकर याच्याविरोधात देशद्रोहाचे कलम लावण्यात आले नाही. पुणे पोलिसांनी जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणातील मोस्ट वॉटेंड असलेल्या दोघांना पकडले. त्याबाबत त्यांनी पोलिसांचे कौतूक केले.