पुणे: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर माजी न्यायामूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांच्यावर टीका केली आहे. ज्यावेळी संसदेत 102वी घटना दुरुस्ती करण्यात आली. त्यावेळी संभाजीराजे संसदेत होते. मग त्यांनी तोंड का उघडले नाही?, असा सवाल कोळसे-पाटील यांनी केला आहे. (Why were you silent at that time in parliament?: b g kolse patil)
बी. जी. कोळसे-पाटील यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना हा सवाल केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं. मराठा समाजाला आरक्षण देणं हे सर्वस्वी केंद्र सरकारच्या हातात आहे, असं सांगतानाच ज्यावेळी संसदेत 102 वी घटना दुरुस्ती करण्यात आली. त्यावेळी संभाजीराजे संसदेत होते, मग त्यांनी तोंड का उघडले नाही?, असा सवाल कोळसे-पाटील यांनी केला आहे.
राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून फक्त राजकीय खेळी खेळली जात आहे. संभाजीराजे ज्या मागण्या केल्याच सांगत आहेत, त्यातून फक्त मराठ्यांच्या नावाने राजकारण केलं जात आहे. असा आरोपही कोळसे-पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, संभाजी छत्रपती यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राज्य सकारकडे पाच मागण्या करतानाच मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी तीन मार्गही सूचवले होते. राज्य सरकारने तात्काळ रिव्ह्यू पिटीशन दाखल करावी. हा राज्य सरकारचाच विषय आहे, रिव्ह्यू पिटीशन टिकलं नाही तर क्युरिटिव्ह पिटीशन दाखल करावी. हा शेवटचा पर्याय आहे. पण हा पर्याय अपवादात्मक आहे. त्यासाठी भक्कम पुरावे घेऊनच कोर्टात जावं लागणार आहे आणि ‘342 अ’ च्या माध्यमातून आपण प्रपोजल केंद्राकडे देऊ शकतो. राज्यपालांच्या माध्यमातून ते राष्ट्रपतींकडे जाणार. राष्ट्रपतींना योग्य वाटलं तर ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे देतील. त्यांना योग्य वाटलं तर ते संसदेकडे पाठवतील, आदी तीन पर्याय संभाजी छत्रपती यांनी सरकारला सूचवले होते.
ओबीसीमध्ये नवीन प्रवर्ग तयार करणं शक्य आहे का? हे पाहावं. ते मी नाही सांगणार. ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं. वंचितांना आरक्षण मिळावं या मताचा मी आहे. शाहू महाराजांनी वंचितांना मुख्य प्रवाहात आणलं होतं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही भूमिका होती, असंही त्यांनी सांगितलं होतं. (Why were you silent at that time in parliament?: b g kolse patil)
VIDEO : SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 29 May 2021https://t.co/JS2cFjJgqD
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 29, 2021
संबंधित बातम्या:
बहुजन समाजाची इच्छा असेल तर नवा पक्षही स्थापन करू; खासदार संभाजी छत्रपती यांचं मोठं विधान
मराठा आरक्षणाच्या हुकूमाची पाने मोदींच्याच हाती, त्यांनीच लक्ष घालावं: संजय राऊत
संभाजीराजे राजीनामा देऊ नका, भाजपात राहूनच आरक्षण मिळेल, नारायण राणेंचा शहाजोग सल्ला
(Why were you silent at that time in parliament?: b g kolse patil)