पिंपरी: बीडमध्ये एकाच रुग्णवाहिकेत 22 मृतदेह कोंबल्याची धक्कादायक घटना उघड झालेली असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये मानवतेला लाजवणारी घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आईच्या मृतदेहाशेजारी एक दीड वर्षाचा मुलगा दोन दिवस उपाशीच बसून होता. या महिलेला कोरोना असण्याच्या भीतीने कोणीही या मुलाजवळ फिरकले नाही. या घटनेवर संताप व्यक्त होत असून कोरोना महामारीमुळे लोक किती भयभीत झाले आहेत, याचं विदारक चित्रंही समोर आलं आहे. (woman found dead in pimpri chinchwad)
पिंपरी चिंचवडमधील दिघी परिसरात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. सरस्वती राजेशकुमार असं या महिलेचं नाव आहे. निवडणूक असल्याने तिचा पती उत्तर प्रदेशात गेला होता. ती आणि दीड वर्षाचा मुलगा दोघेच घरी होते. मात्र, तिचा मृत्यू झाला. घरात कोणीच नव्हतं. हा दीड वर्षाचा मुलगा मृतदेहासोबत खेळत होता. दोन दिवस उपाशी होता. घरात मृतदेहाशेजारी मुलगा खेळत असल्याचं पाहूनही कोणीच या मुलाला घेण्यासाठी धजावले नाही. या महिलेला कोरोना झाला असावा या भीतीने कोणीही पुढे आले नाही. अखेर दोन दिवसानंतर पोलिसांना हा प्रकार कळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुशीला गबाले आणि रेखा वाजे या दोन महिला पोलिसांनी या मुलाला जवळ घेतले. त्याला दूध आणि बिस्किट दिलं. त्यानंतर या मुलाला शिशूगृहात दाखल केलं. सध्या या मुलाची प्रकृती ठिक आहे. महिलेचा पती अजूनही उत्तर प्रदेशातून आलेला नाही. मात्र, दोन दिवस उपाशी असलेल्या मुलाला कोणीही जवळ न घेतल्याने एकच संताप व्यक्त होत आहे.
2538 पॉझिटिव्ह रुग्ण
पुण्यात काल दिवसभरात 2538 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात 4351 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यात करोनाबाधीत 70 रुग्णांचा मृत्यू झाला असून यापैकी 16 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. तर 1371 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 402655 इतकी आहे. एकूण ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 47420 असून आतापर्यंत एकूण 6554 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
ससूनमध्ये सर्वाधिक मृत्यू
पुणे शहरातील एकूण मृतांपैकी अडीच हजार बळी एकट्या ससून रुग्णालयात गेले आहेत. अडीच हजारापैकी 600 जणांचा मृत्यू हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच झाल्याची माहिती आहे. ससूनमध्ये क्रिटिकल रुग्णांना उपचारासाठी पाठवलं जात असल्यामुळे ससूनमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. सध्या 477 रुग्णांवर ससूनमध्ये उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत 6 हजार 498 जणांचा कोरोनानं बळी घेतला आहे. पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला असला तरी मृत्यूची संख्या मात्र आटोक्यात येताना दिसत नाही. (woman found dead in pimpri chinchwad)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 28 April 2021 https://t.co/lna7QLYkTQ #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 28, 2021
संबंधित बातम्या:
ससूनमधून पळताना आरोपी महिला आठव्या मजल्यावरुन पडली, अॅड दीप्ती काळेचा मृत्यू
पुणे महापालिका सिरमची लस खरेदी करणार, महापौरांची माहिती; पुनावाला पुण्याला लस देणार?
(woman found dead in pimpri chinchwad)